जळगाव शहरात दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:05 PM2018-03-24T23:05:27+5:302018-03-24T23:05:27+5:30

वाढते अपघात व जीव जाणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याने खबरदारी म्हणून शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे  सुसाट वेगाने दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली.  दुचाकी जप्त करण्यात येवून सायंकाळी त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.

Action taken on 55 children running in two bicycles in Jalgaon city | जळगाव शहरात दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई

जळगाव शहरात दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे शहर वाहतूक शाखेने राबविली मोहीम प्रत्येकी हजार रुपयांचा दंड पालकांना केले पाचारण

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२४ : वाढते अपघात व जीव जाणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याने खबरदारी म्हणून शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे  सुसाट वेगाने दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली.  दुचाकी जप्त करण्यात येवून सायंकाळी त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते.
अपघातामंध्ये कोवळ्या मुलांचा जीव जात आहे तसेच शहरात दररोज किरकोळ अपघात होऊन त्यात शिकवणीला जाणारे अल्पवयीन मुलेच जखमी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दुचाकी चालविणाºया अल्पवयीन मुलांवरच कारवाई करुन वाहने जप्त करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सागर शिंपी यांना दिले होते. 

स्वतंत्र पथक तयार
सागर शिंपी यांनी या कारवाईसाठी उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, प्रकाश परदेशी, अशोक महाजन, नरेंद्र बागुल, मोनासिंग मंझा, सुभाष पाटील, स्वप्नाली सोनवणे, कविता विसपुते,ज्योती साळुंखे, राजू मोरे व रवींद्र मोरे यांचे पथक तैनात केले होते. या पथकाने बसस्थानक, बहिणाबाई उद्यान, मू.जे.महाविद्यालय परिसर व ख्वॉजामिया चौकात सकाळी ९ ते दुपारी एक यावेळेत कारवाई केली. या सर्व दुचाकीचे कागदपत्रे मागविण्यात आली.

वाहतूक शाखेच्या कार्यालयात भरली जत्रा
 दुचाकी जप्त केल्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात शनिवारी दिवसभर जत्रा भरली होती.त्यात महिलांची संख्या अधिक होती. दुचाकी सोडून द्यावी म्हणून अनेक मुलांनी ओळखीच्या प्रतिष्ठीत लोकांना फोन करायला लावले. मात्र पोलीस अधीक्षकांचाच आदेश असल्याने एकही वाहन सोडण्यात आले नाही. सायंकाळी दंड भरल्यानंतर वाहने सोडण्यात आली.

Web Title: Action taken on 55 children running in two bicycles in Jalgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.