जळगावात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:29 PM2018-10-11T12:29:38+5:302018-10-11T12:31:39+5:30
जागेवरच बजावली पथकाने कारणे दाखवा नोटीस
जळगाव : शाळेमध्ये नोकरी करून उर्वरित वेळेत विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी देऊन वरकमाई करणाºया ला़ना़ विद्यालयातील संजय बाबुराव लोहार या शिक्षकास बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांच्या पथकाने जागेवरच कारणे दाखवा नोटीस बजावली़ शिक्षण हक्क कायद्यातंर्गत खाजगी अनुदानित विद्यालयात शिक्षण देत असताना शाळेतील नोकरीशिवाय अन्य कोणत्याही खासगी क्लासेसमध्ये पार्टटाइमही काम करू नये असा नियम आहे. शिक्षक खाजगी शिकवणी घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी असे शासनाचे आदेश आहे़ त्यानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी महाजन यांच्या पथकाने शहरातील न्यू अभिनव क्लासेसमध्ये तपासणी केली असता लोहार हे शिकवणी घेत असताना आढळून आले़
शिस्तभंगाची कारवाई होणार
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी त्वरीत विद्यालयाला पत्र जारी केले असून त्यात संजय लोहार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिलेले आहे़ त्यानंतर कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सुचना देखील केल्या आहेत़ दरम्यान शिक्षणाधिकाºयांच्या पथकाकडून अचानक क्लासेसला भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे़ सोबतच नोकरीशिवाय अन्य ठिकाणी शिकवणी घेणाºया शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे़