पाचोऱ्यात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:05+5:302021-06-11T04:12:05+5:30

यापूर्वी पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेररोड, बस स्टँडरोड, रेल्वेभुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनिक ...

Action for the third day in a row on encroachment in Pachora | पाचोऱ्यात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

पाचोऱ्यात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

Next

यापूर्वी पाचोरा शहरातील स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेररोड, बस स्टँडरोड, रेल्वेभुयारी मार्ग परिसर, नगरपालिका जिन या भागात सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृत अतिक्रमण केलेल्या हातगाडी, फेरीवाले, रस्त्यावर बसून विक्री करणारे, टपरीधारक यांच्यामुळे खरेदीसाठी येणारे नागरीक, व्यापारी यांची वाहने मुख्य सार्वजनिक रस्त्यातच लावण्यात येत होत्या. यामुळे शहरातील सार्वजनिक रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन, मोठी वाहने, रुग्णवाहिका, विविध शासकीय विभागांची वाहने यांना अडचण निर्माण होऊन वाहनांचा धक्का लागून किरकोळ वाद निर्माण होणे, आदी घटना नित्याच्याच झाल्या होत्या. त्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून मुख्याधिकारी बाविस्कर यांनी धडक मोहीम सुरू केली.

शहरातील मुख्य सार्वजनिक रहदारीवर झालेल्या या कारवाईचे शहरातून सुज्ञ नागरिकांकडून कौतूक होत असून, यापुढेदेखील अशा प्रकारची धडक कारवाई सुरू राहणार असून, कुणीही सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होईल, असे अतिक्रमण करू नये, तसे केल्यास कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले.

ही अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील ताराचंद पाटील, बापू शामू महाजन, सचिन पाटील, विजयसिंग पाटील, होमगार्ड दीपमाला नन्नवरे, सोनाली पाटील, योगीता मराठे, पाचोरा नगर परिषेदेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश दत्तात्रय भोसले, दगडू शिवाजी मराठे, कर निरीक्षक, दत्तात्रय जाधव, लेखापाल, मधुकर सूर्यवंशी,अभियंता (स्थापत्य), हेमंत क्षीरसागर, सहायक नगररचनाकार, साईदास ममराज जाधव, करनिर्धारण अधिकारी, मानसी भदाणे, नगररचनाकार, हिमांश जैस्वाल, उपअभियंता स्थापत्य, प्रकाश शंकर पवार, लिपिक, श्याम ढवळे, लिपिक, श्यामकांत पांडुरंग अहिरे, लिपिक शरद दामू घोडके, चंद्रकांत भगवान चौधरी, विजय पिराजी बाविस्कर, अनिल मेघराज पाटील, विलास प्रभाकर देवकर, पांडुरंग एकनाथ धनगर यांच्या पथकाद्वारे पार पाडण्यात आली.

===Photopath===

100621\10jal_3_10062021_12.jpg

===Caption===

पाचोऱ्यात अतिक्रमणावर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई

Web Title: Action for the third day in a row on encroachment in Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.