अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:48 PM2018-09-02T22:48:04+5:302018-09-02T22:49:06+5:30
भुसावळ येथे रेल्वे प्रशासनाचे पाऊल : २० दुकानदार व शंभरावर झोपडपट्ट्यांचा वीजपुरवठा केला खंडित
भुसावळ, जि.जळगाव : येथे रेल्वे हद्दीतील चाळीस बंगला, लिंपस क्लबपासून आरपीडी रोड यादरम्यान अनधिकृतरित्या रेल्वेची वीज वापरणारे २० दुकानदार आणि शंभरापेक्षा जास्त झोपडपट्ट्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सदर कारवाई रेल्वेचा वीज विभाग व आरपीएफ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान करण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे हद्दीतील जीर्ण क्वार्टर्स व अनधिकृत वीज वापरणाºयांवर धडक मोहीम सुरू केली आहे.
रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने अतिक्रमण काढणे, वीज कनेक्शन कट करणे तसेच रेल्वेचे जीर्ण झालेले क्वार्टर्र्स पाडण्यात आलेले आहे. तसेच अनधिकृत वीज वापरमुळे रेल्वेला लाखो रुपयांचा दर महिन्याला फटका बसतो. अनधिकृत वीजपुरवठा खंडित केल्याने आता रेल्वेला वीज बिलाचे नुकसान सोसावे लागणार नाही.
रेल्वेचे वरिष्ठाधिकारी हजर
रेल्वेच्या वीज विभागाचे एसएससी वहीद खान, एसएससी रमेशचंद्र मीना, जेईई युवराज पाटील, रतनसिंग ठाकूर उपस्थित होते.
तसेच रेल्वे खलासी, रेल्वे विभागाचे लोको, पोलीस निरीक्षक एस.के.पाठक, सहाय्यक एस. के.तिवारी, एएसआय करणसिंग, महिला कॉन्स्टेबल सुनीता परदेशी तसेच कर्मचारी उपस्थित होते.