सीबीआय चार्जशिटमध्ये नाव येईल त्याच्यावर कारवाई
By Admin | Published: April 3, 2017 04:29 PM2017-04-03T16:29:49+5:302017-04-03T16:29:49+5:30
चोपडा शाखेतील नोटबदली प्रकरणात सीबीआयने चाजर्शिट दाखल केल्यानंतर त्यात ज्या अधिकारी व कर्मचा:यांचे नाव येईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
एकनाथराव खडसे : आताच निर्णय घेणे अन्याय ठरेल
जळगाव, दि.3- जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतील नोटा बदल प्रकरणी सीबीआय चौकशी झाली. यात बॅँकेतील काही अधिका:यांची चौकशी व गुन्हा दाखल झाला. याप्रश्नी अद्याप चौकशी सुरू असून चार्जशिटमध्ये ज्यांचे नाव येईल त्या अधिका:यावर बॅँक कारवाई करेल असे माजी मंत्री तथा जिल्हा बॅँकेचे संचालक एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेतून 73 लाख 32 हजाराच्या जुन्या 500 व हजाराच्या नोटा बदली प्रकरणी बॅँकेचे व्यवस्थापकी संचालक जितेंद्र देशमुख, बॅँकेचे चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील, रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरुद्ध सीबीआयने फसवणूक व लाचलुचपत विषयक गुन्हा दाखल केला आहे. यात गेल्या 2 मार्चला सीबीआयच्या पथकाने येथे मुक्काम ठोकून जळगावची मुख्य शाखा तसेच चोपडा शाखेत जाऊन अधिका:यांची कसून चौकशी केली होती. यानंतरही सीबीआय पथकाने जळगावी येऊन तसेच बॅँकेच्या अधिका:यांना मुंबईत बोलावून चौकशी केली आहे.
चौकशी सुरू आहे
सीबीआयच्या पथकाने बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व चोपडा शाखेतील दोघा अधिका:यांची नोटा बदली करून दिल्या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल केला याबाबत बॅँकेने अद्याप कुणावरही कारवाई केली नसल्याबाबत खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, बॅँकेच्या अधिका:यांची यात चौकशी झाली व अद्याप ही प्रक्रिया सुरू आहे. चौकशी सुरू असल्यामुळे त्याबाबत जास्त बोलणे उचित होणार नाही. चौकशी सुरू असताना एकदम कुणावर बॅँकेने कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. याप्रश्नी चार्जशिटमध्ये ज्याचे नाव येईल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बॅँक अडचणीत नाही
राज्यातील 10 जिल्हा बॅँका पुन्हा अडचणीत आल्या आहेत. जिल्हा बॅँकेची याबाबत परिस्थिती काय, असे विचारले असता खडसे म्हणाले, 9 टक्क्याच्या आत ज्या बॅँकांचा सीआरआर आहे त्या अडचणीत आल्या आहेत. सुदैवाने आपल्या बॅँकेचा सीआरआर 9 टक्क्यांवर आहे. त्यामुळे अडचणीतील या बॅँकांमध्ये जिल्हा बॅँकेचा समावेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.