वाहन चोरीची तक्रार न घेतल्यास पोलिसांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:00 PM2018-09-26T16:00:08+5:302018-09-26T16:02:20+5:30

वाहन चोरीसह दखलपात्र गुन्ह्याची तक्रार न घेतल्यास प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे.

Action will be taken against the police if the vehicle does not complain of theft | वाहन चोरीची तक्रार न घेतल्यास पोलिसांवर होणार कारवाई

वाहन चोरीची तक्रार न घेतल्यास पोलिसांवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देजळगाव पोलीस अधीक्षकांचा इशारापोलीस स्टेशनमधून बदली झालेल्यांना मुक्त करादहा वर्षातील संशयितांच्या तपासासाठी स्वतंत्र पथक

जळगाव : वाहन चोरीसह दखलपात्र गुन्ह्याची तक्रार न घेतल्यास प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे. याशिवाय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचेही निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व उपविभागीय अधिकाºयांच्या नावाने वायरलेस संदेश केला.
जिल्ह्यात वाहन चोºयांचे प्रमाण कमालीचे वाढले असून या घटनांवर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.
वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मागील दहा वर्षातील संशयितांना तपासण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करावे व या गुन्हेगारांची पडताळणी करुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील वाहन चोरीच्या बाबतीत रविवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची शिंदे यांनी दखल घेत वायरलेस संदेश जारी केला. सातत्याने होणाºया चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना अधिकाºयांना कडक तंबीच शिंदे यांनी दिली आहे.

प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांना तंबी
पोलीस ठाण्यात वाहन चोरीची फिर्याद घेऊन येणाºया तक्रारदारास परस्पर पोर्टलवर तक्रार करण्याचा सल्ला देऊन तक्रार दाखल करण्यास ठाणे अंमलदाराकडून टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आलेला आहे. हा प्रकार अयोग्य असून पोलीस ठाण्यात दखलपात्र तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करावा, तसे न झाल्यास ठाणे अंमलदार व प्रभारी अधिकाºयांवर कारवाई केली जाईल, असे शिंदे यांनी आदेशात म्हटले आहे.

Web Title: Action will be taken against the police if the vehicle does not complain of theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.