कार्यकर्ते ग्रिटींग कार्ड आणि रेशन कार्ड सारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:27 AM2019-03-15T11:27:53+5:302019-03-15T11:29:14+5:30

जामनेरच्या मेळाव्यात भाजपा तालुकाध्यक्षाचे विधान

Activists like Greeting Cards and Ration Cards | कार्यकर्ते ग्रिटींग कार्ड आणि रेशन कार्ड सारखे

कार्यकर्ते ग्रिटींग कार्ड आणि रेशन कार्ड सारखे

Next
ठळक मुद्देवादग्रस्त

जामनेर: तालुक्यातील भाजपच्या क्षेत्रप्रमुख कार्यकर्त्यांच्या जामनेरला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पक्षाच्या विजयात सामान्य कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचा उल्लेख करुन त्यांना रेशन कार्डची उपमा दिली. त्याच बरोबर काही कार्यकर्ते ग्रिटींग कार्डसारखे असल्याचे विधान केले. या वादग्रस्त विधानाची पक्षांतर्गत तसेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
जळगांव रस्त्यावरील मैदानावर नुकताच हा मेळावा झाला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणापूर्वी बाविस्कर यांचे भाषण झाले. व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांना रेशन कार्डची उपमा देत असतांनाच या कार्डचे उपयोग व महत्व त्यांनी सांगितले. त्याचबरोबर काही ग्रिटींग कार्ड देखील असल्याचा उल्लेख त्यांनी केला व घरात पडलेल्या ग्रिटींग कार्डचा उपयोग कसा व कुणाकडुन केला जातो हे त्यांनी खुमासदार शैलीत सांगितल्याने उपस्थित कार्यकर्त्यांनी, विशेषत: रेशन कार्ड धारकांनी टाळ्या वाजवून समर्थन दिले. महाजन यांनी देखील भाषणात रेशन कार्ड धारक कार्यकर्त्यांमुळेच निवडणुकीत विजय मिळतो असे म्हटले.
मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये ग्रिटींग कार्ड धारकांबद्दल चर्चा रंगली असल्याचे दिसत आहे. बाविस्कर यांनी ग्रिटींग कार्ड धारक कार्यकर्ते म्हणून केलेला उल्लेख नेमका कुणासाठी होता याचीच चर्चा सध्या रंगली आहे

Web Title: Activists like Greeting Cards and Ration Cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.