कडधान्य साठा बंदीबाबत अडत व्यापाऱ्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:12+5:302021-07-07T04:20:12+5:30
बोदवड : केंद्र सरकारने कडधान्य साठवणुकीबाबत नवीन नियम लावले असून, या नियमांतर्गत अडत व्यापाऱ्यांच्या कडधान्य साठवणुकीवर ...
बोदवड : केंद्र सरकारने कडधान्य साठवणुकीबाबत नवीन नियम लावले असून, या नियमांतर्गत अडत व्यापाऱ्यांच्या कडधान्य साठवणुकीवर मर्यादा आल्याने या बंधनाविरोधात व्यापाऱ्यांनी याबाबत सोमवारी बोदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विशाल चौधरी यांना निवेदन दिले.
यात केंद्र सरकारने ही बंदी त्वरित उठवावी त्याचप्रमाणे, कायद्यामुळे दालमील उद्योग संकटात सापडेल त्याचा परिणाम शेतकरी वर्गावरही होणार असून, व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. या कायद्यास बोदवड अडत व्यापारी संघटनेने विरोध दर्शवीत निवेदन कायदा मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. यावेळी गौतम बरडीया, लोकेश अग्रवाल, अभय बाफना, नीलेश अग्रवाल, अक्षय ओस्तवाल, सुमित अग्रवाल, आकाश बुगडी, वसीम बागवान, निखिल अग्रवाल, आदी व्यापारी उपस्थित होते.