ऑक्सिनवरील रुग्णात रोज ५० रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:29+5:302021-04-12T04:14:29+5:30
लोकमत न्यू नेटवर्क जळगाव : पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट ही अधिक गंभीरावस्थेत आलेली आहे. यात अधिकाधिक रुग्णांना ऑाक्सिनचा ...
लोकमत न्यू नेटवर्क
जळगाव : पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट ही अधिक गंभीरावस्थेत आलेली आहे. यात अधिकाधिक रुग्णांना ऑाक्सिनचा पुरवठा करावा लागत आहे. यात गेल्या आठवडाभरापासून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याची स्थिती बघता ही वाढती रुग्णसंख्या ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यावर अधिक परिणाम करणारी ठरत असून यामुळे तुटवड्याची गंभीर समस्याही समोर आली आहे.
जिल्हाभरात १५४१ रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत आहे. ज्यांची ऑक्सिजन पातळी खावली आहे ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, अशा रुग्णांना हा कृत्रिम प्राणवायू द्यावा लागत आहे. गेल्या आठवडाभराची स्थिती बघता यात ३०० रुग्णांची भर पडली आहे. रोज सरासरी ५० रुग्ण वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनची मागणी रोज वाढ नोंदविली जात आहे. जिल्हाभरात सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला करावा लागत आहे. ८ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा या ठिकाणी नियमीत पुरवठा करावा लागत आहे. यास अन्य दोन कक्षांना नियमित शंभर ते दीडशे जम्बो सिलिंडरने ऑक्सिजन पुरवावे लागत आहे.
गेल्या तीन दिवसातील वाढ
८ एप्रिल : १३७५
९ एप्रिल : १४४१
१० एप्रिल : १५३९
ऑक्सिजनची पातळ्या अशा
रुग्णाची रक्तातील ऑक्सिजनची पातळी साधारण ठेवण्यासाठी त्यांना बाहेरून या ऑक्सिनचा पुरवठा करावा लागतो. यात रुग्णाच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक मिनिटाच्या हिशेबाने हे ऑक्सिजन दिले जाते.
२ ते ५ लीटर प्रतिमिनिट
१० लीटर प्रतिमिनिट
१५ लीटर प्रतिमिनट या पातळीपर्यंत बॅग ॲन्ड मास्कचा वापर केला जातो
१५ ते २५ लीटरपर्यंत ऑक्सिनची आवश्यकता असेल तर हाय फ्लो नेझल कॅन्यूला याद्वारे हा पुरवठा केला जातो.
२५ लीटरच्या वरती आवश्यकता असेल तर एनआयव्ही लावून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. दररोज या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे.