जादा प्रवेशांसाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक

By admin | Published: June 16, 2017 04:09 PM2017-06-16T16:09:36+5:302017-06-16T16:09:36+5:30

सहायक शिक्षण संचालक दिलीप गोविंद : 11 वी प्रवेश प्रक्रिया 24 पासून

Additional admission required for education department is required | जादा प्रवेशांसाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक

जादा प्रवेशांसाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.16 - कुठल्याही महाविद्यालयात कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेमध्ये 11 वीसाठी क्षमतेपेक्षा किंवा मंजूर जागांपेक्षा अधिकचे प्रवेश द्यायचे असल्यास त्यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागाची परवानगी बंधनकारक राहील. ही परवानगी घेतली नाही तर संबंधित प्रवेशांवरील अनुदान मिळणार नाही, अशी माहिती नाशिक विभागाचे सहायक  शिक्षण संचालक दिलीप गोविंद यांनी शुक्रवारी 11 वी व 12 वी बाबतच्या प्रवेश प्रक्रिया कार्यशाळेत दिली. 
मु.जे.महाविद्यालयातील विवेकानंद भवनात ही कार्यशाळा झाली. व्यासपीठावर गोविंद यांच्यासह उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, सहायक शिक्षण उपनिरीक्षक ए.बी.बागुल, आर.एल.माळी आदी होते. सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे प्रा.सुनील गरूड  व उपप्राचार्य डी.पी.भोळे यांच्याहस्ते दिलीप गोविंद यांचा सत्कार झाला. 
जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्र स्थापन करा
11 वी प्रवेशांबाबत माहिती व्हावी, मार्गदर्शन करता यावे यासाठी जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मार्गदर्शन केंद्र स्थापन करा. त्यात वर्ग 2 अधिका:याची नियुक्ती करा. त्यात रोजच्या 11 वीच्या प्रवेशाची विविध महाविद्यालयांची माहिती, संवर्गनिहाय जागा, रिक्त जागा याची सविस्तर माहिती असावी, अशा सूचना गोविंद यांनी दिल्या. 

Web Title: Additional admission required for education department is required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.