खडसे यांच्या साखर कारखान्याला जादा कर्ज - आमदार पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:12 AM2020-01-10T04:12:09+5:302020-01-10T04:12:20+5:30
खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांची भागीदारी असलेल्या संत मुक्ताई साखर कारखान्यास मात्र किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले आहे.
जळगाव : जिल्हा बँकेकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या व बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांची भागीदारी असलेल्या संत मुक्ताई साखर कारखान्यास मात्र किंमतीपेक्षा जादा कर्ज दिले आहे. हा सत्तेचा दुरूपयोग असून या गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दूरध्वनीवरून तक्रार केली आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार देणार असल्याची माहिती मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आमदार पाटील यांनी सांगितले की, हा खासगी कारखाना आधी ४९ कोटींना शिवाजी जाधव यांनी घेतला. नंतर खडसे या त्यात भागीदार झाल्या. या खासगी कारखान्यासाठी ५१ कोटी कर्ज जिल्हा बँकेने मंजूर केले. त्यापैकी उचल मात्र केवळ ३० कोटींचीच करण्यात आली.