चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:39 PM2018-01-16T12:39:47+5:302018-01-16T12:42:38+5:30

खंडणी प्रकरण

Additional Superintendent of Chalisgaon Circle, filled up to 25 lakhs | चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम

चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी 25 लाखांसाठी भरला दम, न्यायालयात उलगडला डांबून ठेवल्याचा घटनाक्रम

Next
ठळक मुद्देकंत्राटदारासाठी घेतले 21 लाखाचे धनादेशलोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजर

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16-  मनोज लोहार यांनी डांबून ठेवत 25 लाख रुपये दिल्याशिवाय तुझी सुटका करणार नसल्याचा दम भरल्याची माहिती डॉ.उत्तमराव महाजन यांनी सोमवारी न्यायालयात दिली.
चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालिन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांच्याविरुध्द दाखल गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज न्या.पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सुरु  आहे. फिर्यादी डॉ. महाजन यांनी लोहार व उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, धीरज येवले व अनिल देशमुख  यांनी कसा छळ केला याची माहिती न्यायालयाला दिली.
दुस:या दिवशी सकाळी आठ वाजता मुलगा मनोज हा भेटायला आला असता, या दोन्ही कर्मचा:यांनी लोहार यांचे नाव सांगून त्याला मला भेटू दिले नाही. त्यावेळी आरडाओरड व गोंधळ झाल्याने लोहार यांनी मुलाला त्यांच्या कार्यालयात बोलावले. सकाळी दहा वाजता लोहारांच्या कार्यालयात आणले तेथे माझा मुलगा मनोजही आला होता. त्याला तेव्हाही भेटू दिले नाही.
एस.पीं.ना कळविल्याने लोहार यांनी केली शिवीगाळ
सासरे पैसे घेऊन येत असल्याचे सांगितल्यानंतर लोहार यांनी स्वत: फोनवरुन संभाषण ऐकले व तीन वाजेर्पयतची मुदत दिली. त्याचवेळी निंबाळकर याच्या मोबाईलवर पोलीस अधीक्षकांचा फोन आला व महाजन तेथे आहेत का? अशी विचारणा त्यांना केली. हा प्रकार समजल्यानंतर लोहार यांनी पोलीस अधीक्षकांना कोणी सांगितले असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यावेळी  पोलीस अधीक्षक स्वत: माङयाशी बोलले व काही म्हणणे असेल   तर  कार्यालयात येऊन सांगा असे त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहिल्यानंतर लोहार यांनी  हे प्रकरण इथेच मिटवू,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करु नका असे सांगत पुन्हा दम भरला.
कंत्राटदारासाठी घेतले 21 लाखाचे धनादेश
महाजन यांच्याविरुध्द तक्रारदार देणा-या कंत्राटदारासाठी 21 लाख व स्वत: लोहार यांच्यासाठी 25 लाख रुपये मागण्यात आले होते. त्यासाठी 1 जुलै रोजी दुपारी एक वाजेर्पयत लोहार यांनी मुदत देत दम दिला होता. 30 जून रोजी डांबून ठेवल्याची माहिती नातेवाईक व कार्यकत्र्याना मिळाल्याने लोहार यांनी तातडीने रात्रीतून जागा बदलवून येवले याच्या काकाच्या घरी गच्चीवर नेले होते. यावेळी काळ्या रंगाच्या कारमधून नेण्यात आले.एका बाजुने निंबाळकर तर दुस:या बाजुने येवले बसलेला होता.  तेथे रात्री दोन वाजता 21 लाखाचे धनादेश लिहून घेतले होते.
लोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजर
सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, मुळ फिर्यादीतर्फे अॅड.पंकज अत्रे, अॅड.अविनाश पाटील, मनोज लोहार यांच्यातर्फे अॅड.निलेश घाणेकर (औरंगाबाद), अॅड.सुधीर कुळकर्णी, निंबाळकरतर्फे अॅड.सागर चित्रे व येवलेतर्फे अॅड.आर.के.पाटील यांनी काम पाहिले. मंगळवारी उलटतपासणी होणार आहे. यावेळी न्यायालयात लोहार यांच्यासह तिन्ही संशयित हजर होते. लोहार सध्या नाशिक येथे विभागीय नागरी हक्क संरक्षण विभागाचे पोलीस अधीक्षक या पदावर आहेत.

Web Title: Additional Superintendent of Chalisgaon Circle, filled up to 25 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.