जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:15 AM2021-04-05T04:15:14+5:302021-04-05T04:15:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून ...

Adequate stocks of remedesivir for the district | जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा

जिल्ह्यासाठी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली होती. पालकमंत्र्यांच्या या मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असून, जिल्ह्यात रेमडेसीवर इंजेक्शनचा तुटवडा कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक रविवारी ऑनलाईन पार पडली. यात जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव येथून सहभागी झाले. या बैठकीत लॉकडाऊन किंवा त्याला सक्षम पर्याय बाबत सविस्तर चर्चा झाली. यात गुलाबराव पाटील यांनी अन्य दोन मंत्र्यासह वीक एंड लॉकडाऊनचा पर्याय सुचविला असता, याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. दरम्यान, राज्यात नवीन निर्बंध लवकरच लागू करण्यात येत असून यात शेतमालाच्या वाहतुकीला बंदी घालू नये आणि खासगी प्रवासी वाहतुकीवर मात्र निर्बंध घालावेत अशी आग्रही मागणी त्यांनी केली असता याला देखील मान्यता देण्यात आली. जिल्ह्यात सध्या रेमडेसिवीरची कृत्रीम टंचाई सुरू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय रूग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी देखील केली. यावर जळगाव जिल्ह्यात रेमडेसीवरची टंचाई भासणार नाही इतका पुरेसा साठा उपलब्ध करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Web Title: Adequate stocks of remedesivir for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.