आडगाव शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:39 PM2019-12-20T16:39:10+5:302019-12-20T16:40:02+5:30

धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी येथे पार पडले.

Adgaon School's three-day resident scout guide camp | आडगाव शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर

आडगाव शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देशिबिरात स्वावलंबनासह घेतले विविध धडेहुंडाविरोधी, अंधश्रध्दा टाळण्यासह प्लॅस्टिक न वापरण्याचा केला जागर

आडगाव, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक शाळेचे तीन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलदारवाडी येथे पार पडले.
ज्ञानेश्वर माऊली यांच्या सहकार्याने सिध्देश्वर आश्रमात झालेल्या या शिबिराच्या अध्यक्षस्थानी भानुदास महाराज होते.
यावेळी आडगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शालीग्राम पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण, पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे, पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य जाधव, प्रा.सुनील निकम, भावलाल कुमावत, संस्थेचे संचालक जयराम चौधरी, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, डेप्युटी स्काऊट कमिशनर सीमा माडवळकर, मुख्याध्यापक एस.टी.पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी स्काऊट ५१ विद्यार्थी, ६४ गाईड भाग घेतला. यावेळी शिबिरात स्वावलंबन, हुंडाविरोधी, अंधश्रध्दा निर्मूलन, प्लॅस्टिक निर्मूलन, वृक्षतोड यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्ये दाखविली.
प्राचार्य जाधव, सभापती स्मितल बोरसे, प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक किरण पाटील, तर आभार अभिलाष महालपुरे यांनी मानले.

Web Title: Adgaon School's three-day resident scout guide camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.