जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेत आदित्य देशमुखची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:43 PM2019-05-03T12:43:22+5:302019-05-03T12:54:25+5:30

संकेतस्थळ हँग झाल्याने निकाल पाहण्यासाठी आल्या अडचणी

Aditya Deshmukh stays CBSE exam in Jalgaon CBSE | जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेत आदित्य देशमुखची बाजी

जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेत आदित्य देशमुखची बाजी

googlenewsNext

जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता सीबीएसईच्या संकेस्थळावर जाहिर झाला़ यामध्ये शहरातील सेंट जोसेफचा विद्यार्थी आदित्य प्रशांत देशमुख याने सर्वाधिक ९४़४ टक्के गुण मिळवून आपली चमक दाखवली.
दरम्यान, हा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जाहीर होणार होता़
शहरात रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, उमवि केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, गोदावरी सीबीएसई स्कूल, ओरियन स्कूल तसेच पोदार स्कूल या सीबीएई शाळा आहेत़ या शाळांमध्ये सीबीएई बारावीची परीक्षा ही शहरातील सीबीएसई शाळांमध्ये २ मार्चला प्रारंभ झाली होती़ महिनाभर परीक्षा चालल्यानंतर २ एप्रिल रोजी परीक्षा संपली़ गुरूवारी दुपारी साडेबारा वाजता संकेतस्थळावर आॅनलाइन निकाल जाहीर झाला़ त्यानंतर मध्यंतरी थोडा वेळ संकेतस्थळ हँग झाले होते़ त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या़ मात्र, काहीवेळानंतर संकेतस्थळ सुरूळीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला़
असा आहे शाळानिहाय निकाल
सेंट जोसे स्कूल
शहरातील सेंट जोसेफ स्कूलमधील आदित्य प्रशांत देशमुख हा ९४़४ टक्के गुण मिळवून अव्वलस्थानी राहिला आहे़ त्याने स्कूलमधून तसेच शहरातून देखील अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर रितेश प्रमोद जाधव ९०़२ टक्के गुण तर पियुष सुनील न्याती ९० टक्के गुण मिळाले आहेत.
विद्यापीठ केंद्रीय विद्यालय
बांभोरी येथील केंद्रीय विद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यालय शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यात अथर्व पुराणिक या विद्याथ्यार्ने ८८.४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय हर्षवर्धन सिंग याला ८४.४ टक्के, तृतीय दिव्या महाजन ८२.२ टक्के तर अंतरा पुराणिक या विद्यार्थिनीने ८१.८ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला आहे.
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल
रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल जाहीर झाला असून प्रिया बालाणी या विद्यार्थिनीने ९४.२ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय आयुषी पायघन ९३.६ टक्के गुण तर रोशनी चोरडिया हिने ८९ टक्के मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे़ अशी माहिती याजवीन पेसुना यांनी दिली़
ओरियन सीबीएससी स्कूल
शहरातील ओरियन सीबीएससी स्कूलचा ९८ टक्के निकाल लागला आहे. यात अमित चौधरी या विद्यार्थ्याने ९० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
द्वितीय वेदांत भोळे ८८ टक्के गुण तर जागृती पाटील या विद्यार्थिनीने ८३.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्या सुषमा कंची, उपप्राचार्या माधवीलथा सित्रा यांसह शिक्षकांनी कौतुक केले.
पोदार स्कूल
पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यानी बारावी परीक्षेत यश संपादन केले आहे़ यामध्ये शाळेतून देविका पाटील ही ९३ टक्के गुण मिळवून प्रथम आली असून द्वितीय अमिषा पटनायक ही ८९़४ टक्के गुण मिळवून तर ८२़२ टक्के गुण मिळवत श्रृष्टी लोढा ही विद्यार्थिंनी तृतीय आली आहे़ रेणुका गोहिल ही विद्यार्थिंनी ८२ टक्के गुण मिळवत चतुर्थ स्थानावर आहे़

कॉर्मर्स शाखेतून मयुर व्यास याने ९६़२० टक्के गुण मिळवत प्रथम आला आहे तर ८७़८ टक्के गुण मिळवत कुश मलारा याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे़
गोदावरी सीबीएसई स्कूल
गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल शाळेची उच्च निकालाची परंपरा कायम राहीली असून १२ वी निकाल ९८ टक्के लागला आहे. भावेश पाटील याला ८६.६ टक्के गुण मिळवत स्कूलमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे़ ध्रुव विकास काबरा ८३ टक्के गुण मिळवत व्दीतीय ठरला असून प्रांजल संजय दाणी ८२.६ टक्के मिळवत तृतीय क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, प्रिन्सीपल निलीमा चौधरी यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
अन् शिक्षकही गोंधळात़़़
गुरूवारी अचानक बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थी सुध्दा गोंधळे गेले़ त्यामुळे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली होती़ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहºयावर आनंद झळकून येत होता़ तर पालकांकडूनही आपल्या पाल्याला पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला़
अ‍ॅपवर पाहिला निकाल
यंदाही निकाल पाहण्यासाठी विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले होते़ त्यावरही अनेक विद्यार्थ्यांनी घर बसल्या निकाल पाहिला़ यामुळे शाळांमध्ये निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली नाही़ तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून गौरव करण्यात आला़ तर जे विद्यार्थी कंपार्टमेंटमध्ये (कमी गुण) आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांची पुढच्या महिन्यात पुनर्रपरीक्षा घेण्यात येणार आहे़
उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचेय़़़आदित्य
गेल्या दोन वर्षापासून नियमित तीन ते चार तास अभ्यास करायचो़ परीक्षा काळात तर सहा ते सात तास अभ्यासाचे नियोजन होते़ संस्कृत, फिजीक्स, कॅमेस्ट्री, इंग्लिश विषयात सर्वाधिक गुण मिळाले याचा आनंद आहे़ आई-वडीलांसारखे डॉक्टर व्हायचे स्वप्न आहे़ येत्या रविवारी नीटची परीक्षा आहे़ त्यासाठी तयारी केली आहे. उच्चशिक्षण घेऊन े स्वप्न पूर्ण करायचे आहे. एकत्र कुटूंब असल्यामुळे काका-काकू, आजी-आजोबांचा देखील अभ्यासासाठी नेहमीच चांगली साथ मिळाली आहे़
प्रथमेश चौधरीला ९२़५ टक्के गुण
महाबळ कॉलनी येथील रहिवासी प्रथमेश भालचंद्र चौधरी हा विद्यार्थी राजस्थान राज्यातील कोटा येथील सर्वोदय सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी असून त्याने सीबीएसई बारावी परीक्षेत ९२़५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे़

Web Title: Aditya Deshmukh stays CBSE exam in Jalgaon CBSE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव