आदिवासी महामोर्चाने दणाणले शहर

By admin | Published: January 25, 2017 01:02 AM2017-01-25T01:02:43+5:302017-01-25T01:02:43+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : चर्चेसाठी अर्धातास अधिकारीच नाही आदिवासी बांधवांचा संताप लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Adivasi Mahamchorke is the city of magnumen | आदिवासी महामोर्चाने दणाणले शहर

आदिवासी महामोर्चाने दणाणले शहर

Next

जळगाव : आदिवासी बांधवांवर होणारा अन्याय दूर करावा, आदिवासी वसतिगृहातील मुबारक तडवीचा संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करावी व आश्रमशाळांमधील मुलींवर होणारे लैगिक अत्याचार थांबावेत यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी अधिकार महामोर्चा काढून प्रशासन व शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या मोर्चात महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणिय होती. यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिका:यांच्या दालनात एक  तास ठिय्या आंदोलन केले. निवेदन घेण्यास तब्बल अर्धातास कोणीही अधिकारी नसल्याने मोर्चेक:यांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील आदिवासींच्या आठ संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सकाळी 11 वाजेपासून आदिवासी बांधव डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ एकत्र येत होते. दुपारी 12 वाजता या मोर्चास सुरूवात झाली. टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, नवीनबस स्टॅँड, स्वातंत्र्य चौकामार्गे हा मोर्चा विविध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
मुबारक तडवीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करा, त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत करा
4बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार करणा:यांना फाशी द्या
4आदिवासी आश्रम शाळांमध्ये घोटाळे करणा:यांवर कारवाई करावी व तेथील सर्व जबाबदारी शासनाने घ्यावी
4अॅक्ट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा
4आदिवासींच्या वापरातील जमीन नियमित करून मिळावी
4शहरी व आदिवासी भागातील बेघर आदिवासींनी घरकुल मिळावे
4पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेचे नाव बदलून धरती आबा मिरसा मंडा योजना असे नामकरण करावे
435 हेक्टर वरील जलाशय मासेमारीसाठी आदिवासींना द्या
4आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी
4जिल्ह्यात आदिवासी सल्लागार समिती स्थापन करावी
4आदिवासींना जंगलात वावर करण्यास मनाई करणा:यांवर अॅक्ट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करावी
4भूमीहिनांना दहा एकर जमीन देण्यात यावी
4निसंशयीत जमातींना जातीचे दाखल देण्यासाठी स्थानिक पातळ्यांवर कॅम्प लावण्यात यावे
4शासकीय सेवेतील आदिवासींची पदोन्नती रोखून ठेवणा:यांची चौकशी करण्यात यावी
49 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त सुटी जाहीर करावी
4आदिवासी योजनांचा निधी इतरत्र वळविला जाऊ नये
4मागासवर्गीयांचा 20 टक्के निधी खर्च न करणा:यांवर कारवाई करावी
4अनुसूचित क्षेत्रात इनर लाईन परमीट सिस्टीम लागू करा
4परराज्यातून आलेल्या व स्थानिक वसतीगृहात शिकत असलेल्या विद्याथ्र्याची चौकशी करा
4मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग   होता.
जोरदार घोषणा अन् हातात तिरकामठे
मोर्चात सहभागी आदिवासी बांधवांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. तर अनेक जण तिरकामठे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. ‘जीना हो तो मरणा सिखो कदम कदम पे लढता सिखो, आदिवासी एकता ङिांदाबाद, लढेंगे जितेंगे., मुबारक तडवीला न्याय मिळालाच पाहिजे, खुशहाली जहाँ होती है जहाँ हरयाली होती है, आला रे आला आदिवासी आला, अॅक्ट्रॉसिटी कायदा कडक करा, आदिवासी मुलींवर अत्याचार करणा:यांना फाशी द्या, जल, जंगल, जमीन कोणी से अमनी से अमनी से.. यासह विविध फलक तसेच घोषणा मोर्चात सहभागी आदिवासी बांधव देत होते. यासह अनेकाच्या हातात लाल रंगाचेध्वजही होते.
आदिवासी संघटना आल्या एकत्र
आदिवासी अधिकार मोर्चात आदिवासी एकता परिषद व पंच मंडळ, आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच, आदिवासी सेवा मंडळ, आदिवासी पावरा विकास परिषद, राष्ट्रीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी एकता विद्यार्थी परिषद, एकलव्य भिल्ल समाज संघटना, पारधी विकास महासंघ आदी संघटना व त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चाचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असताना बाहेर उपस्थित समुदायास दामु ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.
निवासी उपजिल्हाधिका:यांच्या दालनात ठिय्या
मोर्चेक:यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 2.30 वाजता पोहोचले.  तब्बल अर्धातास त्यांचे निवेदन घेण्यास कोणीही अधिकारी पुढे नसल्याने मोर्चेक:यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिका:यांनीच निवेदन स्विकारावे असे या प्रतिनिधींचे म्हणणे होते. अखेर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आल्यावर त्यांच्या दालनात पदाधिका:यांनी प्रवेश केला.  येथे पदाधिका:यांनी नाराजी व्यक्त केली.
आचारसंहिता संपल्यानंतर बैठक घेणार
आदिवासींच्या मागण्यांसाठी आठ दिवसात बैठक बोलवा अशी मागणी हे पदाधिकारी करत होते. मात्र आठ दिवसात बैठकीचे  लेखी आता देऊ शकत नसल्याचे मुंडके यांनी सांगितल्यावर पदाधिका:यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली. अखेर दिल्लीला असलेल्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राहूल मुंडके यांनी आचारसंहिता संपल्यावर आदिवासींच्या प्रश्नावर बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले.
यांनी केले नेतृत्व
मोर्चा यशस्वीतेसाठी व निवासी उपजिल्हाधिका:यांच्या दालनात चर्चेप्रसंगी मोर्चाचे संयोजक सुनील गायकवाड, एम.बी. तडवी, सुनील गायकवाड, एम.बी. तडवी, जया सोनवणे, सुभान तडवी, पन्नालाल माळवी, राजू तडवी, रूपसिंग वसावे, सुधाकर वाघ, अमित तडवी, डॉ. चंद्रकांत बारेला, इब्राहीम तडवी आदींनी निवेदन दिले. तसेच वहारू सोनवणे, एकनाथ अहिरे, यशवंत अहिरे, करण सोनवणे, मुकेश वाघ, रमा ठाकरे, विजय सोनवणे, दिलीप सोनवणे, नासिर तडवी, लालचंद बोरसे, राजू गायकवाड आदींचा मोर्चात सहभाग होता.

Web Title: Adivasi Mahamchorke is the city of magnumen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.