बोदवड तालुक्यातील आदिवासी घरकुलांच्या प्रतीक्षेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 03:48 PM2018-12-23T15:48:25+5:302018-12-23T15:53:11+5:30
बोदवड तालुक्यातील आदिवासी पारधी व भिल्ल समाजाच्या पारधी व शबरी आवास (घरकुल) योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुल योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.
जितेंद्र पारधी
जामठी, ता.बोदवड : तालुक्यातील आदिवासी पारधी व भिल्ल समाजाच्या पारधी व शबरी आवास (घरकुल) योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुल योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित आहेत.
दरम्यान, बोदवड पंचायत समितीच्या वतीने पारधी व भिल्ल समाजाकडून वेळोवेळी प्रस्तावाची मागणी करण्यात आली. मात्र अद्यापही लाभ मिळत नसल्याने लाभार्र्थींची पंचायत समिती कार्यालयात भटकंती सुरूच आहे.
पारधी योजनेंतर्गत सहाचा लक्ष्यांक व शबरी योजनेंतर्गतचाही सहाचा लक्ष्यांक बोदवड तालुक्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आला आहे व त्यानुसार बोदवड पंचायत समितीत पारधी योजनेकरिता सात, तर शबरी योजनेसाठी सहा प्रस्ताव बोदवड पंचायत समितीत दाखल करण्यात आले आहेत. यातील जवळपास निम्म्याच्या आसपासच्या लाभार्र्थींच्या प्रकरणांची आॅनलाइन नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र मंजुरीसाठी समाजकल्याण विभागाची (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) मंजुरी मिळविण्यासाठी पंचायत समितीच्यावतीने गेल्या दोन महिन्यांपासून पंचायत समिती कार्यालयात आदिवासींचे प्रस्ताव मंजुरीअभावी धूळखात पडून आहेत.
यासाठी संबधित अधिकाºयांंकडे वेळोवेळी लाभार्थी चक्करा मारतात व त्यांच्यावतीने टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येतात.
लाभार्र्थींनी गटविकास अधिकाºयांशी संपर्क केला असता गेल्या आठवडाभरापासून बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे कळाले. दरम्यान, तालुक्यातील आदिवासी हे कार्यालयात चक्करा मारून हैराण होत असल्याचे चित्र आहे.
- आदिवासी च्या घरकुलांनबाबत समाज कल्याण विभाग (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) च्या मंजुरीसाठीची बैठक २७ रोजी जळगाव येथे होणार आहे. मंजुरी मिळताच लाभार्र्थींना लाभ देण्यात येईल.
- आर.ओ.वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, बोदवड