घरकुले न उभारणाऱ्यांवर प्रशासनाने वळविली वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:42 AM2018-08-11T00:42:02+5:302018-08-11T00:42:39+5:30

जळगाव जिल्ह्यातील पारोळा, चोपडा, जामनेर, भडगाव व धरणगाव येथील स्थिती, रक्कम घेऊनही कामे न करणाºया लाभार्र्थींना बजावणार नोटिसा

The administration has turned the curtain on non-builders | घरकुले न उभारणाऱ्यांवर प्रशासनाने वळविली वक्रदृष्टी

घरकुले न उभारणाऱ्यांवर प्रशासनाने वळविली वक्रदृष्टी

Next


पारोळा/चोपडा/जामनेर/भडगाव/धरणगाव, जि.जळगाव : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घरकुल उभारण्यासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम स्वीकारली, पण घरकुल उभारणीस सुरुवात न करणाºया लाभार्र्थींवर प्रशासनाने वक्रकृष्टी वळवली आहे. घरकुलांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने पथके नियुक्त केली आहेत.
पारोळा तालुक्यात एकूण २०८ घरकुल लाभार्र्थींनी पहिला हप्ता घेऊनही घरकुलांची कामे अपूर्ण ठेवली आहेत. आॅगस्टपर्यंत जर ही कामे पूर्ण केली नाहीत तर अशा लाभार्थीवर फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती गटविकास अधिकारी आर.के.गिरासे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विविध घरकुल योजनेत सन २०१६-१७ साली ७०९ घरकुले मंजूर झाली. २०१७-१८ साली ९२६ घरकुले मंजूर झाली. सन २०१८-१९ मध्ये ३३२ घरकूल मंजूर झाली आहेत. असे पारोळा तालुक्याला १ हजार ९६७ घरकुलांचे उद्दिष्टे देण्यात आली होते. आतापर्यंत ७४५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १ हजार २२२ घरकुलांची कामे अपूर्ण आहेत. त्यात १ हजार १४ घरकुलांची कामे प्रगतीला आहेत. पहिला हप्ता घेऊनही २०८ लाभार्र्थींची कामे अपूर्ण आहेत.
चोपडा तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून ३५९९ लाभार्र्थींना घरकुले देण्यात आली आहेत. मात्र ३५९९ घरकुलांपैकी २११९ घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे ज्या लाभार्र्थींनी ३१ आॅगस्टअखेर घरकुलाचे बांधकाम केले नाहीत अशा लाभार्र्थींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बी.एस.कासोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यात २११९ घरकुल अपूर्णर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. कामात हलगर्जीपणा करणारे क्षेत्रीय अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
भडगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून १२४८ घरकुले देण्यात आली आहेत. यातील ६२७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून, ६२१ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहेत. ज्यांनी घरकुलांचे बांधकाम केलेले नाही त्यांनी आठ दिवसात काम सुरू न केल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दिली.
जामनेर तालुक्यात २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत एक हजार ९३५ घरकुले मंजूर झाली आहेत. यातील ९७५ पूर्ण झाली असून, ८७४ अपूर्ण आहेत. पहिला हप्ता घेऊनही कामे सुरू न करणाºया ८६ लाभार्र्थींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिला. पं.स.सभागृहात आढावा बैठक झाली. त्यात ते बोलत होते. या वेळी विस्तार अधिकारी ए.एस.पालवे, डी. एस.लोखंडे, एन.ई.घोडके, पी. आर.राणे, जे.बी.पाटील, एम. वाय.जावळे उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात तालुक्यात १ हजार ८७४ घरकुले मंजूर करण्यात आली असून, अद्याप १ हजार ८९ घरकुले अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. अनुदानाचा लाभ घेऊन घरकुलांचे काम न करणाºया लाभार्र्थीं फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी विविध घरकुल योजनांच्या आढावा बैठकीत दिला.

घरकुलांवर एक दृृष्टिक्षेप
तालुका मंजूर पूर्ण अपूर्ण
पारोळा १९६७ ७४५ १२२२
चोपडा ३५९९ १४८० २११९
जामनेर १९३५ ९७५ ८७४
भडगाव १२४८ ६२७ ६२१
धरणगाव १८७४ ७८५ १०८९

Web Title: The administration has turned the curtain on non-builders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.