आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:01 PM2020-06-03T12:01:58+5:302020-06-03T12:02:08+5:30
१०२ मृत्यूनंतर आज आढावा : वाढलेला मृत्यूदर, रुग्णसंख्येमुळे आरोग्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची वेळ
जळगाव : जिल्ह्याचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यूदरापेक्षा चौपट व जळगाव जिल्हा कोरोना मृत्यूत राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असे चित्र असतानाही या गंभीर बाबीकडे प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याचे चित्र असल्याने याची आता थेट आरोग्य मंत्र्यांनीच दखल घेतली आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दौºयाच्या पार्श्वभूमीवर जळगावात डागडुजी सुरू झाली आहे. आरोग्य मंत्री टोपे हे आढावा घेण्यासाठी ३ जून रोजी जळगाव दौºयावर येत असून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करण्यासह आढावा बैठक घेणार आहे़
जिल्ह्यात सोमवारी १३ मृत्यूची नोंद झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा ८ मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूची संख्या शंभरावर गेली आहे़ गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या, मृत्यूदर वाढीबाबत विविध क्षेत्रातून ओरड होत असतानाही स्थानिक पातळीवर हव्या त्या उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या़ मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध पातळ्यांवर विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली. यात अचानक प्रशासक म्हणून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली़ या सोबतच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस ़चव्हाण यांनी रावेरात जावून आढावा घेतला़ ‘मृत्यूदर व बदलीचा विषय डीनला’च विचारा असे सांगणारे संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी कोविड रुग्णालयात डॉक्टरांची खरडपट्टी करणे, प्रांताधिकाऱ्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या़ अशा घडामोडी एकाच दिवसात घडल्या व डागडुजी सुरू झाली.
वाढलेल्या मृत्यूदराची ह्यपीएमओह्णकडून दखल, ५ रोजी केंद्रीय पथक जळगावात
जिल्हाभरातील बाधितांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत वेगवेगळ््या राजकीय मंडळींकडून तक्रारी होण्यासह आता खुद्द खासदार उन्मेष पाटील यांनीच पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी केली. जळगावातील या प्रकाराची तेथे दखल घेण्यात आली असून ५ जून रोजी जिल्ह्यात केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे. मुंबई पुणे मालेगाव यांच्या तुलनेत जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाकडे आरोग्य प्रशासनाविषयी तक्रार केली आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या मृत्यू आणि त्यांना देण्यात येणाºया आरोग्य सुविधेतील उणिवा विषयी चिंता केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी येत्या ५ जून रोजी प्रशासकीय अधिकारी व जळगावचे जिल्हाधिकारी राहिलेले कुणालकुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला. तसा संदेश खासदार पाटील यांना दिला. आरोग्य प्रशासनाची तपासणी करून यंत्रणेचा अहवाल केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे देणार आहे़
शनिवार ठरला कोरोनावार, एकाच दिवसात ८० रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार शनिवारी एकाच दिवसात तब्बल ८० बाधित रुग्ण जिल्हाभरात आढळून आलेले आहेत़ यात प्रशासनाकडून आधी ५५ रुग्णांची माहिती जाहीर करण्यात आली होती़ नंतर तीन रुग्ण वाढल्याचे समोर आले त्यानंतर ३० मे रोजी सायंकाळी ७:३० वाजता २२ रुग्ण आढळून आल्याची माहिती रविवारी जाहीर करण्यात आली़ यासह रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ३८ नवीन रुग्ण तर ८ जणांचे अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आलेले आहे़