कराडी येथे कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासन छतावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 08:12 PM2020-02-24T20:12:43+5:302020-02-24T20:14:36+5:30
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले.
पारोळा/यावल (जि.जळगाव) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील कराडी व यावल तालुक्यातील हिंगोणा गावातून कर्जमुक्तीच्या प्रमाणपत्राचे सोमवारी वितरण करण्यात आले. मात्र कराडी गावात कनेक्टीव्हीटीसाठी प्रशासनाला चक्क तीन ठिकाणी सर्व साहित्य घेऊन फिरावे लागले. कनेक्टीव्हीटीसाठी चक्क छतावर जावे लागले. त्यामुळे तब्बल तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळाले. तर हिंगोणा येथे १२० शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली.
सोमवारी कराडी या गावात प्रशासनाने तयारी पूर्ण केली होती. पण इंटरनेटची कनेक्टीव्हीटी (रेंज) नसल्याने तयारी केलेल्या प्रशासनाची फसगत झाली.
कनेक्टीव्हीटीसाठी चार ठिकाणे
सुरवातीला कराडी ग्रामपंचायतीत यादी वाचन करण्यात आले. नंतर आॅनलाईन प्रकियासाठी कनेक्टीव्हीटी नसल्याने स्वस्थ धान्य दुकानात साहित्य हलवण्यात आले. त्यानंतर सुदाम मराठे यांच्या घरी आले. तरीदेखील कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने शेवटी राजेंद्र भगवान पाटील यांच्या घरी साहित्य घेऊन गेले. त्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी मिळाल्यानंतर देवचंद नामदेव वानखेडे यांचे आॅनलाईन काम करण्यात आले. त्यानंतर आज दिवसभरात फक्त १० लाभार्र्थींची प्रकिया पूर्ण झाली. विशेष म्हणजे कनेक्टीव्हीटीसाठी घराच्या छतावर जावे लागत होते. सकाळी साडेदहापासून प्रशासन संगणक, प्रिंटर घेऊन फिरत होते. तीन तासानंतर चौथ्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी आल्यानंतर प्रशासनाच्या जिवात जीव आला व त्यानंतर आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा नाहरकत दाखल देण्यात आले.
हिंगोणा गावात १२० शेतकºयांची कर्जमाफी
कर्जमुक्ती अंतर्गत आधार प्रमाणिकरण करण्याची अंमलबजावणी होण्यासाठी हिंगोणा गावाची निवड करण्यात आली होती. केलेली असून संस्थेचे एकूण सभासद संख्या १३५४ इतकी आहे. त्यापैकी ३३४ सभासद हे संस्थेचे कर्जदार सभासद आहेत.त्यापैकी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत निश्चित केलेल्या मुदतीत १३८ सभासद थकबाकिदार असून त्यांचे मुद्दल रुपये ७८.२३ लाख व व्याज रुपये १९.२८ लाख असे एकूण रुपये ९७.५१ लाख रक्कम कर्ज माफीस पात्र आहे. प्रत्यक्षात १२० शेतकºयांची कर्जमाफीसाठी यादी प्राप्त असून त्यांचे ८२ लाख ७५ हजाराचे कर्ज माफ झाले आहे.