ऑक्सिजन कान्सनट्रेर वाढविण्यावर प्रशासनाचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:18 AM2021-04-23T04:18:10+5:302021-04-23T04:18:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ऑक्सिजन पुरवठ्याची आणिबाणी सुरू असताना ती कमी करण्यासाठी आता ऑक्सिजन कान्सनट्रेटर वाढविण्यावर प्रशासनाने भर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ऑक्सिजन पुरवठ्याची आणिबाणी सुरू असताना ती कमी करण्यासाठी आता ऑक्सिजन कान्सनट्रेटर वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला असून सद्यस्थितीत ६० ते ७० ऑक्सिजन कान्सनट्रेटर जिल्ह्यात कार्यरत आहे. आणखी शंभर कान्सनट्रेटर खरेदी करण्याचे नियेाजन असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात मागणीपेक्षा कमी ऑक्सिजनपुरवठा होत असला तरी त्याची अगदीच कठीण परिस्थिती नियोजन केले जात आहे. टँकर दुसऱ्या दिवशी आले तरच पुरवठा अशी कठीण परिस्थिती आहे. मात्र, आतापर्यंत हा पुरवठा सुरळीत असल्याची माहिती आहे. मात्र, या ऑक्सिजनच्या पुरवठ्याची ही परिस्थिती हाताळण्यासाठी ऑक्सिजन कान्सनट्रेटर हा चांगला पर्याय असल्याचे प्रशासनाचे मत असून हवेतून ऑक्सिजन निर्मीती करून रुग्णांना ते पुरविण्यात येेते. सद्यस्थितीत प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात तीन ते चार ऑक्सिजन कान्सनट्रेटर असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
न्हावीला चांगले नियाेजन
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी यावल, न्हावी. फैजपूर, रावेर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात पाहणी केली. न्हावी येथे ३० रुग्ण ऑक्सिजनवर तर एकूण ३६ रुग्ण दाखल आहेत. य ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांनी चांगली व्यवस्था केल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. यासह फैजपूर येथे ओटूच्या ५० बेडच्या कोविड सेंटरचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी आमदार शिरीष चौधरी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. दरम्यान, स्थानिक रुग्णालयांमध्ये सर्व घटकांकडून समस्या जाणून घेऊन त्या स्थानिक पातळीवरच सोडविण्याचा सध्या प्रयत्न असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.