चोरवड येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:02 AM2019-01-23T01:02:28+5:302019-01-23T01:04:18+5:30
पारोळा तालुक्यातील चोरवड येथे नुकतीच जिल्हा व तालुकास्तरीय विविध विभागातील शासकीय अधिकाºयांची कार्यशाळा पार पडली.
पारोळा : तालुक्यातील चोरवड येथे नुकतीच जिल्हा व तालुकास्तरीय विविध विभागातील शासकीय अधिकाºयांची कार्यशाळा पार पडली. पाणी फाऊंडेशनच्या लोक चळवळीनिमित्त ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. मागील वर्षी जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा येथे या चळवळीत जनतेचा उत्स्फुर्त सहभाग होता.
२०१९ या वर्षाच्या स्पर्धेत आणखीही गावांना सहभाग घेता यावा ह्यासाठी १८ व १९ रोजी चोरवड येथे प्रशासकीय अधिकाºयांची ही विशेष निवासी कार्यशाळा आयोजित केली होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोटे, जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी, चोरवडचे कृषि सहायक, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते. प्रशिक्षणा दरम्यान मनसंधारणातून जलसंधारण कसे करता येईल यावर विविध सत्रे घेण्यात आली. यात खेळ, गोष्टी, फिल्म्सच्या माध्यमातून हसत खेळत हे प्रशिक्षण पार पडले. सर्व अधिकारी आपले पद विसरून दोन दिवस पूर्णपणे या प्रशिक्षणात समरस झाले होते.
प्रशिक्षणाबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना भोकरे म्हणाले की, 'पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण जल संधारणास फारच उपयुक्त आहे. सर्व गावांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घ्यावे. प्रशिक्षणास गावकरी उपस्थित राहतील या करता सर्वांनी प्रयत्न करावेत.' चोरवड ग्रामस्थांनी सर्व प्रशिक्षणार्थींना स्मृतीचिन्ह देऊन सन्माननित केले. गावकºयांचे प्रेम पाहून सर्व अधिकारीही भारावून गेले होते.