25 कोटींवर प्रशासनाची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 12:20 AM2017-02-09T00:20:00+5:302017-02-09T00:20:00+5:30
निधीची प्रतिक्षा संपली : शासनाकडे प्रस्ताव रवाना
जळगाव : मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी मनपा क्षेत्रातील रस्ते विकास तसेच अन्य कामांसाठी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली होती़ महानगर पालिकेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या 25 कोटींच्या विकास निधिच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी बुधवारी स्वाक्षरी करून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी नगरविकास विभाग मंत्रालयाकडे पाठविला आह़े यामुळे निधीअभावी ब्रेक लागलेल्या शहरातील अंतर्गत रस्त्यांचे भाग्य उजळणार आह़े
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे 2015 मध्ये जिल्हा दौ:यावर आले असता त्यांनी मनपा क्षेत्रातील रस्ते विकास तसेच अन्य कामांसाठी 25 कोटींच्या विकास निधीची घोषणा केली होती़ हा निधी गेल्या वर्षी मंजूर होवून निधी मनपाकडे वर्ग होण्यासाठी मनपा सभेकडून कामांचा ठराव करून तो जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्याबाबत कळविण्यात आले होत़े त्यानुसार महापालिकेने महासभेत ठराव करून तो छाननीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता़
निधीचा मार्ग मोकळा
महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने गेल्या काही वर्षापासून शहरातील रस्ते दुरूस्तीच्या कामांना ब्रेक लागला होता़ यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती़ या पाश्र्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली होती़ छाननीपूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी प्रस्तावावर स्वाक्षरी करून महापालिकेसाठी वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतुदीन्वये 24 कोटी 98 लक्ष 42 हजार 298 रूपयांचा प्रस्ताव मंजुरी व अनुदान उपलब्ध होणेकामी शासनाकडे रवाना केला आह़े यामुळे आता महापालि केला रस्ते कामांसाठीचा 25 कोटी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आह़े
शहराअंतर्गत रस्त्यांचे उजळणार भाग्य
राष्ट्रीय महामार्गावरील वाढते अपघात हा चिंतेचा विषय बनला आह़े त्यामुळे नागरिकांना महामार्ग टाळून शहरात ये-जा करण्यासाठी शहरातील अंतर्गत रस्ते सोयीचे आह़े मात्र त्याची दुरवस्था असल्याने नागरिकांना नाईलाजाने महामार्गावरून प्रवास करावा करावा लागत होता़ 25 कोटींचा प्रस्तावात रस्ते विकासाची 99 कामे आहेत़ त्यात राजा ट्रॅक्टर ते शिवाजीनगर, बळीराम पेठत भागातील रस्ते, गोविंदा रिक्षा स्टॉप ते भोईटे रेल्वे गेट व रेल्वे गेट ते बजरंग बोगद्यार्पयतचा मार्ग, कोर्ट चौक ते गणेशकॉलनी आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आह़े
25 कोटींच्या निधीनंतर या रस्त्यांचा कामांना वेग येणार आह़े या रस्ते झाल्यास महामार्गावर वाहतुकीचा ताण कमी होवून अपघात टाळण्यास मदत होणार आह़े