भुसावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींवर नियुक्त होणार प्रशासक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:08 PM2020-09-09T20:08:37+5:302020-09-09T20:10:13+5:30
भुसावळ तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे.
उत्तम काळे
भुसावळ : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी नियोजन केले आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मान्यता घेऊन यादी प्रसिद्ध होण्याचे संकेत देण्यात आले आहे. २६ ग्रामपंचायतीवर १२ अधिकाऱ्यांंच्या नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे एका अधिकाºयाकडे दोनपेक्षा जास्त ग्रामपंचायती येणार आहे.
मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे सार्वत्रिक निवडणुकांना होऊ न शकलेल्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा प्रशासनपदी योग्य व्यक्तीची निवड करण्यात यावी यासाठी शासनाने अतोनात प्रयत्न केले. मात्र न्यायालयाच्या आदेशाने विस्तार अधिकाºयाच्या वरच्या दर्जाचे प्रशासक म्हणून नियुक्ती होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
या ग्रामपंचायतीची १२ पासून संपणार मुदत
तालुक्यातील कुºहे (पानाचे), किन्ही, कंडारी, खंडाळा, मन्यारखेडा, काहुरखेडा या ग्रामपंचायतीची मुदत १२ रोजी संपत आहे.
फेकरी ग्रामपंचायतींची मुदत १३ रोजी संपत आहे.
साकरी, टहाकळी, पिंपळगाव बुद्रूक, जोगलखेडा, जाडगाव, कठोरा बुद्रूक व साकेगाव या ग्रामपंचायतींची मुदत १४ रोजी संपत आहे.
बोहर्डी बुद्रूक, पिंपरीसेकम, आचेगाव, हतनूर, बेलव्हाय, सुसरी या ग्रामपंचायतीची मुदत १६ रोजी संपत आहे.
वांजोळा, कठोरा खुर्द, शिंदी या ग्रामपंचायतीची मुदत १८ रोजी संपत आहे.
खडका, मांडवे दिगर या ग्रामपंचायतीची मुदत २० रोजी संपत आहे, तर ४ आॅक्टोबर रोजी दर्यापूर या ग्रामपंचायतीचे मुदत संपत आहे.
या अधिकाºयांची होणार निवड
दरम्यान, येथील पंचायत समितीने २६ ग्रामपंचायतींसाठी विस्तार अधिकाºयांसह शाखा अभियंता, कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा १२ अधिकाºयांच्या नावांची यादी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. त्या ग्रा.पं.विस्तार अधिकारी यादीत उमेश पाटणकर, शाखा अभियंता गणेश ठाकूर, शाखा अभियंता सचिन बडगे, एल.डी.ओ. विस्तार अधिकारी सलीम बशीर तडवी, आरोग्य विस्तार अधिकारी किशोर तायडे, कृषी विस्तार अधिकारी कपिल सुरवाडे, कृषी विस्तार अधिकारी सुनील दांडगे, विस्तार अधिकारी सांख्यिकी अनिल सुरडकर, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम धाडी, कृषी अधिकारी प्रभाकर मोरे, आरोग्य विस्ताराधिकारी संजय विसपुते.