योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 08:38 PM2019-11-23T20:38:11+5:302019-11-23T20:38:23+5:30
कार्यशाळा : प्रा़ राहुल त्रिवेदी यांचा सल्ला ; विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन
जळगाव- करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असताना पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोजक्याच पर्यायायांचा विचार केला जातो़ त्यामुळे ठरावीक अभ्यासक्रमांना प्रवेश घेले जातात़ म्हणून योग्य मार्गदर्शन घेऊन पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असा सल्ला प्रा़ राहुल त्रिवेदी यांनी दिला़
आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, संत हरदासराम हिंदी हायस्कूल व जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्यावतीने रायसोनी महाविद्यालयातील सभागृहात शुक्रवारी दहावी ते बारावीनंतरचे अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांमधील संधी या विषयावर कार्यशाळा पार पडली़
कोणत्याही कामाचा कमी पणा बाळगू नका
प्रा़ राहुल त्रिवेदी पुढे म्हणाले की, प्रत्येकामध्ये अनेक गुण असतात, ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नुसत्याच नोकऱ्यांच्या मागे लागू नका. स्वत:मधील प्रतिभा शोधा आणि कोणत्याही कामाबाबत कमीपणा बाळगू नका तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा, असे त्यांनी सांगितले़ यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
यांनी घेतले परिश्रम
रायसोनी कनिष्ट महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद खराटे यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा घेण्यात आली़ कार्यशाळेत प्रा. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. तर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पल्लवी भालेराव, प्रा. उज्वला मालुसरे, प्रा. शितल किनगे, प्रा. सोनल तिवारी, प्रा. राखी वाघ, प्रा. शुभांगी अहिरे, आणि प्रा. संतोष मिसळ आदींनी परिश्रम घेतले़