लॉकडाऊन संपताच मिळणार प्रवेशाबाबत सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:14 AM2021-04-19T04:14:36+5:302021-04-19T04:14:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले ...

Admission notifications will be available at the end of the lockdown | लॉकडाऊन संपताच मिळणार प्रवेशाबाबत सूचना

लॉकडाऊन संपताच मिळणार प्रवेशाबाबत सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्‍या कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. त्यास रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. परिणामी, आरटीईअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी पडताळणी समितीकडे जाऊ नये. लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर आवश्यक सूचना केल्या जातील, असे शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्‍यात आले आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर दरवर्षी प्रवेश दिला जात असतो. यंदा जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांधील ३ हजार ६५ जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. नुकतीच पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्‍यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर प्रतीक्षा यादीमध्‍ये सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, सध्या राज्यभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. परिणामी, या काळापर्यंत आरटीईची प्रक्रियासुद्धा थांबविण्‍यात आली आहे. या कालावधीत पालकांनी पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणीसाठी गर्दी करू नये व लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवेशाबाबत पोर्टलवर सूचना करण्‍यात येतील, असे स्पष्ट आदेश पालकांना केले आहेत.

मुदतीत कागदपत्रांची तपासणी करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया थांबविण्‍यात आली असली, तरी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध होताच पालकांना कागदपत्रांची तपासणी करावयाची आहे. दरम्यान, पालकांना एसएमएस पाठविण्‍यात आले आहेत. मात्र, पालकांनी केवळ एसएमएस संदेशावरच अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाचा दिनांक तपासून पाहावा, त्यावर प्रवेश घेण्याची तारीख दाखविली जाईल. त्या मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Web Title: Admission notifications will be available at the end of the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.