९४० जागांसाठी असणार आयटीआयची प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:08+5:302021-07-07T04:21:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यंदा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ...

Admission process of ITI for 940 seats | ९४० जागांसाठी असणार आयटीआयची प्रवेश प्रक्रिया

९४० जागांसाठी असणार आयटीआयची प्रवेश प्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यंदा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) ९४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. नुकतीच ट्रेडनिहाय जागांची यादी व्यवसाय शिक्षक, प्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

येत्या काही दिवसांत इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. अकरावीसह आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. आयटीआयसाठी प्रवेशाचे सूत्र ठरवायचे तरी कसे, असा प्रश्न व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण विभागापुढे होता. मात्र, विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यात प्रवेशाबाबत चर्चा करण्यात आली. आयटीआयला प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातील असतात. त्यांच्या सोयीसाठी केवळ दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे व प्रवेश नियमानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्याचे निश्चत करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.

जागांची संख्या वाढली

मागील वर्षी शासकीय आयटीआयमधील ९१२ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. आता या जागांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. यंदा ९४० जागांसाठी शासकीय आयटीआयध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दरवर्षी दहावीच्या निकालानंतर जून महिन्यात आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यापासून ही प्रक्रिया प्रारंभ झाली. दरम्यान, यंदा दहावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. निकालानंतर आयटीआय प्रवेशाच्या तारखादेखील जाहीर करण्यात येणार आहेत.

अशा आहेत शासकीय आयटीआयतील जागा

कारपेंटर - २४, कॉम्प्युटर ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट -४८, मेकॅनिकल-२०, इलेक्ट्रीशियन-८०, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक-४८, फिटर-८०, फॉन्ड्रीमॅन-२४, इन्स्ट्रूमेंट मॅकेनिक-२४, मशिनिस्ट-१००, मशिनिस्ट ग्राईंडर-६०, मॅकेनिक डिझेल-४८, मॅकेनिक मशिन टुल्स मेंटेनन्स-४८, मॅकेनिक मोटार व्हेईकल-४८, मॅकेनिक ट्रॅक्टर-२०, प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर-४०, पंप ऑपरेटर-२०, रेफ्रीजरेशन ॲण्ड एअर कंडीशनर टेक्निशियन-२४, टूल ॲण्ड डायमेकर-२४, टर्नर-६०, वेल्डर-८०, वायरमॅन-२०.

Web Title: Admission process of ITI for 940 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.