देश वाचविण्यासाठी विषमुक्त शेती अंगिकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 05:40 PM2020-02-03T17:40:48+5:302020-02-03T17:41:51+5:30
रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे.
पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : रासायनिक कीटकनाशके व खतांच्या अधिक वापराने शेतीची सुपीकता धोक्यात आली आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात विषयुक्त अन्न जात आहे. याला रोखण्यासाठी विषमुक्त शेतीचा मूलमंत्राचा अंगीकार शेतकऱ्यांनी करून देश वाचवावा, असे आवाहन असे कृषीशास्त्रज्ञ डॉ.जी.एस. गील यांनी येथे केले आहे.
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे आयोजित विषमुक्त शेती कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते .
याआधी प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी अकोला येथील शेतीतज्ज्ञ शरद इंगळे, आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक संजय पवार, माधुरी गुजराती, चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख, तालुका कृषी अधिकारी डॉ. अभिमन्यू चोपडे, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्याम सावळे, डॉ. सुरेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच नीता पाटील यांचा सरपंच ‘आॅफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मेणगाव येथील सरपंच सुरेश पाटील यांचाही सेंद्रिय शेतीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक आयोजक संतोष चिंचोले यांनी केले. सूत्रसंचालन शंकर भामरे यांनी केले. आभार राजधर पांढरे यांनी मानले. याप्रसंगी माजी सरपंच प्रदीप लोढा, पंचायत समितीचे माजी सभापती बाबूराव घोंगडे, अॅड.संजय पाटील, भिका पाटील, जगन धनगर, प्रा.पी.पी.लहासे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.