पिंपळकोठा येथील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 22:24 IST2021-03-07T22:23:48+5:302021-03-07T22:24:20+5:30
पिंपळकोठा ता. पारोळा येथे एका प्रौढाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

पिंपळकोठा येथील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : पिंपळकोठा ता. पारोळा येथे दि. ७ रोजी पहाटे ५ वाजता एका प्रौढाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत महेंद्र सुभाष पाटील यांनी खबर दिली की, गावातील नवनीत भगवान पाटील (४८ ) हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. दि. ७ रोजी त्यांनी त्यांच्या घराशेजारील शाळेच्या आवारात असलेल्या एका झाडाला गळफास घेतली. ही घटना पहाटे ५ वाजता घडली. याबाबत काही नागरिकांनी ही घटना बघितली असता, त्यांनी घरच्या मंडळींना माहिती दिली.
यावेळी प्रमोद पाटील, मुकेश पाटील, राजेश पाटील यांनी नवनीत पाटील यांना खाली उतरवित पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉ. योगेश साळुंखे यांनी त्यास मयत घोषित केले याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद होउन पुढील तपास हवलदार नाना पवार करत आहेत.