जळगावात प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 01:34 PM2020-06-12T13:34:06+5:302020-06-12T13:35:13+5:30
आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जळगाव - बिबा नगर येथील युवराज पुंडलिक पाटील (५५) यांनी मध्यरात्री छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही, याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज पुंडलिक पाटील हे सेक्टर नं. २ बिबा नगर येथे दोन मुलांसह वास्तव्याला होते. गुरुवारी रात्री ११.३० वाजता मुलगा रवींद्र पाटील हा कामावरुन घरी आला होता. सोबत जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री युवराज पाटील यांनी छताला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगा रवींद्र हा उठल्यानंतर वडीलांनी गळफास घेतल्याचे त्याला दिसले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला.प्राथमिक तपास हवालदार मगन मराठे करीत आहे.
'स्वयंशिस्त मात्र पाळावीच लागेल, गर्दी करणे आरोग्याला अपायकारक' https://t.co/v8UvcSyVXO#coronavirus#uddhavThackeray#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 12, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल
"आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत ते..."; भारत-चीन सीमावादावरून पंतप्रधानांवर निशाणा
CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...
CoronaVirus News : आशेचा किरण! कोरोनाच्या लढ्याला यश येणार, मांजरींवरील 'हे' औषध प्रभावी ठरणार?