पोटात चाकू भोसकून प्रौढाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:05+5:302021-01-03T04:17:05+5:30
शवविच्छेदन अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू म्हटले असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. ही घटना १ ...
शवविच्छेदन अहवालात गंभीर दुखापतीमुळे मृत्यू म्हटले असून नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पाटील हे अविवाहित होते. उधना, सुरत येथे ते वास्तव्याला होते. दोन महिन्यांपासून ते खेडीत आले होते. पुतण्या ज्ञानेश्वर अशोक पाटील यांच्याकडे ते वास्तव्याला होते. भाजीपाला विक्री करायचे. शुक्रवारी ते मद्याच्या नशेत होते. दारू पिण्यासाठी त्यांनी कुटुंबाकडे पैसे मागितले, तेव्हा कुटुंबीयांनी नकार दिला. त्यानंतर ही घटना घडली. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेबाबत गुंतागुंत निर्माण झाल्याने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसीचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडूनही माहिती जाणून घेतली. पुतण्या, त्याची पत्नी व इतरांचे जबाब घेण्याचे काम शनिवारी सुरू होते. घटना नेमकी काय आहे, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.