मासे पकडायला गेलेल्या प्रौढाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:17+5:302021-04-08T04:16:17+5:30
फोटो जळगाव : मासे पकडायला गेलेल्या रामा साहेबराव पारधी (वय ४५, रा. धानोरा बु. ता. जळगाव) या प्रौढाचा ...
फोटो
जळगाव : मासे पकडायला गेलेल्या रामा साहेबराव पारधी (वय ४५, रा. धानोरा बु. ता. जळगाव) या प्रौढाचा धानोरा गिरणा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी एक वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा साहेबराव पारधी हे शेती व शेळी पालन करायचे. दररोज सकाळी आठ वाजता शेळी चारण्यासाठी जायचे आणि ११ वाजता परत यायचे. बुधवारी ते सकाळी आठ वाजता घराबाहेर पडले. दुपारी एक वाजता गिरणा नदीच्या पात्रात मासे पकडण्यासाठी गेले असता त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार बाजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. पोलीस पाटील पती देवराम सोनवणे यांनी तालुका पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार विश्वनाथ गायकवाड, सुशील पाटील, दीपक कोळी करीत आहे. रामा यांच्या पश्चात पत्नी रेखा, ईश्वर आणि चेतन ही दोन मुले असा परिवार आहे.