सुजदे येथे बैलाच्या हल्ल्यात प्रौढ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:18+5:302021-03-13T04:29:18+5:30

जळगाव : तालुक्यातील सुजदे शिवारात बैलाच्या हल्ल्यात बाळू श्रावण न्हावी (वय : ५०, रा.असोदा) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना ...

Adult killed in bull attack at Sujade | सुजदे येथे बैलाच्या हल्ल्यात प्रौढ ठार

सुजदे येथे बैलाच्या हल्ल्यात प्रौढ ठार

googlenewsNext

जळगाव : तालुक्यातील सुजदे शिवारात बैलाच्या हल्ल्यात बाळू श्रावण न्हावी (वय : ५०, रा.असोदा) या प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजेच्यापूर्वी घडली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सुजदे शिवारात लक्ष्मण सोनवणे यांचे शेत आहे. शेतात त्यांची बैलजोडी बांधलेली होती. गुरूवारी सकाळी बाळू न्हावी हे बैलांजवळ आला. त्यावेळी एका बैलाने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, अतिरक्तस्त्रावामुळे बाळू यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार गावातील नागरिकांना कळताच, त्यांनी पोलीस पाटील अशोक सोनवणे यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी जावून पाहिल्यावर बाळू न्हावी हे मयत स्थितीत आढळून आले. घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पंचनामा झाल्यानंतर मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बैलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस पाटीलांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

Web Title: Adult killed in bull attack at Sujade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.