ॲड.चव्हाण यांच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 06:54 PM2023-03-01T18:54:50+5:302023-03-01T18:55:05+5:30
मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपीच्या घरात रक्ताने माखलेला चाकू ठेवण्यासाठी कट रचत फसवणुक केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
कुंदन पाटील
जळगाव : मराठा विद्या प्रसारक संस्थेतील वादप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित आरोपीच्या घरात रक्ताने माखलेला चाकू ठेवण्यासाठी कट रचत फसवणुक केल्याच्या गुन्ह्यात तत्कालिन सरकारी वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीनावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सोमवारी तपास अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने दि.२ मार्च रोजी न्या.आर.वाय.खंडारे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे,
खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन आदेशानुसार तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव येथे विशेष तपास पथकासमोर रविवारी हजर झाले.
नीलेश रणजीत भोईटे (जळगाव) यांच्या फिर्यादीवरून विजय भास्कर पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या चौकशीत साक्षीदार व पुण्यातील व्यावसायिक तेजस मोरे यांचा जबाब नोंदविण्यात आला होता. मोरे यांनी कट कारस्थान रचण्यासंदर्भात झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लीप सादर केली होती. त्यानंतर ॲड. प्रवीण चव्हाण यांना सहआरोपी करण्यात आले होते. या गुन्ह्यात रविवारी रात्री चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांनी अटक केली होती.
सोमवारी न्यायालयाने ॲड.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हा जामिनासाठी अर्ज सादर केल्यावर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी मात्र, अन्य एका गुन्ह्यात न्यायालयाचे कुठलेही आदेश नसल्याचे स्पष्ट होताच जळगाव शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ॲड. चव्हाण यांना ताब्यात घेत रात्री उशीरा अटकेची कारवाई केली होती. म्हणणे सादर करण्यासाठी दि.२ मार्चपर्यंत मुदत मागितली होती. त्यामुळे ॲड.चव्हाण यांचा कारागृहातील मुक्काम वाढला होता. त्यांच्या जामिनावर आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.