ॲड. प्रवीण चव्हाणांचा ‘धमकी’नामा एसआयटीकडे; फिर्यादीने पुरविला दस्तावेज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 11:40 AM2023-02-10T11:40:24+5:302023-02-10T11:42:03+5:30

दस्तावेज सोपविणाऱ्या सूरज झंवर यांनी  ॲड. चव्हाण माझ्यासकट परिवारास धोका निर्माण करू शकतात, असा उल्लेखही केला आहे.

Adv. Praveen Chavan's threat letter to SIT Document provided by the plaintiff | ॲड. प्रवीण चव्हाणांचा ‘धमकी’नामा एसआयटीकडे; फिर्यादीने पुरविला दस्तावेज

ॲड. प्रवीण चव्हाणांचा ‘धमकी’नामा एसआयटीकडे; फिर्यादीने पुरविला दस्तावेज

Next

जळगाव: ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार व फसवणूक प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तपासी अधिकाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचा दस्तावेज विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपविण्यात आला आहे. दस्तावेज सोपविणाऱ्या सूरज झंवर यांनी  ॲड. चव्हाण माझ्यासकट परिवारास धोका निर्माण करू शकतात, असा उल्लेखही केला आहे.

सूरज सुनील झंवर (रा. जळगाव) यांनी  १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार ॲड. प्रवीण पंडित चव्हाण, शेखर मधुकर सोनाळकर, उदय नानाभाऊ पवार यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत आहे. 

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात ॲड. चव्हाण त्यांच्या बाजूने शासनाविरोधात लढत होते. पुढे चालून रायसोनी ‘बीएचआर’च्या गैरव्यवहारात अडकले. त्यानंतर ॲड. चव्हाण यांनी राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करून पतसंस्थेवर विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून घेतल्याचा दावा झंवर यांनी या तक्रारीत केला आहे.

फॉरेन्सिक ऑडिटर नेहा फडके यांना दमदाटी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी ॲड. चव्हाण यांनी दिली होती. त्यासंदर्भात फडके यांनी ९ मार्च २०२२ रोजी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे. 

ॲड. कीर्ती पाटील यांची चौकशी करा
शेखर सोनाळकर यांनी लेखापरीक्षक  असताना ‘बीएचआर’मधील गोपनीय दस्तावेज ॲड. कीर्ती पाटील यांना पुरविला. ॲड. पाटील बीएचआरच्या सभासद व संचालक नसतानाही त्यांच्याकडे ‘बीएचआर’ची संपूर्ण माहिती उपलब्ध होती. त्याबद्दल ॲड. कीर्ती पाटील यांची चौकशी व्हावी, अशी मागणी झंवर यांनी केली आहे.

...तर सोनाळकरांवर गुन्हा दाखल करा
लेखापरीक्षक सोनाळकर यांनी ‘बीएचआर’कडून १५ लाखांचा मेहनताना घेतला. तसेच सीआयडीकडूनही त्यांनी मेहनताना घेतल्याची शक्यता आहे. तसे असेल तर सोनाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

Web Title: Adv. Praveen Chavan's threat letter to SIT Document provided by the plaintiff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.