अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 03:30 PM2018-12-17T15:30:04+5:302018-12-17T15:30:10+5:30

राजकारणासह समाजकारण करणाऱ्या बोदवड तालुक्यातील मनूर येथील पाटील घराण्याची परंपरा अविरत वाहणाºया झºयासारखी सुरू आहे.

Adv. Ravindra Patil: Spiritual and Co-operative Warakari | अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी

अ‍ॅड.रवींद्र पाटील : अध्यात्म व सहकारातील वारकरी

Next

गोपाल व्यास
जळगाव : जिल्ह्यायात सहकारमहर्षी कै.प्रल्हादराव एकनाथराव पाटील व त्यांच्या सेवेचा वसा घेतलेले वारस अ‍ॅड.रवींद्र पाटील.
ल्ह्यातील बोदवड तालुक्यातील मनूर येथील स्वातंत्र्य सेनानी व तत्कालीन आमदार कै.एकनाथराव संपतराव पाटील यांचा वारसा चालविणारे सहकारमहर्षी कै.प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाचा विचार केला.
शिखर बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष उल्लेखनीय म्हणावा लागेल. बोदवड आणि जामनेर तालुक्यातील कोरडवाहू शेतकºयांसाठी तापी नदीतून मुक्ताई जलउपसा योजना सुरू करून शेतकºयांच्या शेतीला नवी दिशा त्यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ४० हजार हेक्टरला सिंचनाची व्यवस्था होईल, अशी महाराष्ट्रातील एकमेव अभूतपूर्व अशी इरिगेशन योजना होती. ही उपसा योजना असून त्यासाठी त्यांनी त्याकाळी ४८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ती नऊ वर्षे व्यवस्थित चालली. शेतीला पाणी मिळाल्याने बागा फुलवू लागले. परिणामी आर्थिक उत्पन्न वाढल्याने येथील शेतकरी सधन, सक्षम बनला.
सुरवातीला त्यांनी गावचे सरपंच म्हणून उत्तम कारभार केला. जिल्हा परिषदेचे सदस्य आणि तालुका सभापती म्हणून त्यांनी गावचा सरपंच ते शिखर बँकेचा अध्यक्ष अशी पदे त्यांना मिळाली. त्यांच्या संघटन कौशल्याची दाद खुद्द शरद पवार यांनी दिली होती.
प्रल्हादरावांचे राजकारण व सहकाराचे कार्य त्यांचे पुत्र अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सुरू ठेवले आहे. राजकारण, समाजकारण व अर्थकारण या तिन्ही क्षेत्रात जनसेवेचा वारसा अ‍ॅड.रवींद्र पाटील हे जोपासत आहेत, तेही जिल्हा परिषद सदस्य तसेच अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, पणन संघाचे संचालक, मुक्ताई मंदिर संस्थानचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी जबाबदारी पार पाडत आहेत. दरवर्षी न चुकता पंढरीच्या वारीला जाण्याचा आपल्या वडिलांचा वारसा ते नित्यनेमाने जोपासत आहेत.

Web Title: Adv. Ravindra Patil: Spiritual and Co-operative Warakari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.