प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला केलं फौजदार

By admin | Published: May 14, 2017 07:38 PM2017-05-14T19:38:46+5:302017-05-14T19:38:46+5:30

ऐन पंचविशीत असताना जीवनसाथी असलेल्या पतीने जगाचा निरोप घेतला तेव्हा आभाळ कोसळल्याचं दु:ख वाटय़ाला आले

In the adverse circumstances, the child made the army | प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला केलं फौजदार

प्रतिकूल परिस्थितीतही मुलाला केलं फौजदार

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 14 - ऐन पंचविशीत असताना जीवनसाथी असलेल्या पतीने जगाचा निरोप घेतला तेव्हा आभाळ कोसळल्याचं दु:ख वाटय़ाला आले. एक मुलगी आणि दोन मुलं अशा एकूण तीन चिमणीपाखरांचं भविष्य अंधारात असल्याचं वाटलं. मात्र पती गेल्यानंतर माङो गुरू तथा पित्याने मला आधार दिला. ‘बेटा, हिंमत हरू नकोस, बाबासाहेबांनी आपल्याला परिस्थितीवर मात करणं शिकवलंय, रडू नकोस, जीवनाशी लढ’ या वडिलांच्या गुरूमंत्राने  मी जीवनाशी संघर्ष केला. त्यांच्याच प्रय}ाने  नोकरीला लागले अन् मुलांचं शिक्षण पूर्ण करून त्यांना पोलीस अधिकारी, प्राध्यापक पदावर पाहून आज माङो हृदय भरून येतं..’, अशी भावना धरणगाव येथील प्रमिला जगन्नाथ सपकाळे यांनी व्यक्त केली.
या 57  वर्षीय मातेची जीवन संघर्षाची कहाणी आजच्या आत्महत्या करून जीवन संपविण्याच्या विचार करणा:या महिलांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

वडील चळवळीतील कार्यकर्ते
प्रमिलाताईंनी सांगितलं की, माङो वडील श्रीपत केदार हे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते होते. समाजात ज्या काळात शिक्षणाचा अभाव होता त्या काळात धरणगावच्या गौतमनगर परिसरात त्यांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवून शिक्षणाचा प्रसार केला. स्वत: मुख्याध्यापक असल्याने समाजात त्यांची एक वेगळी प्रतिष्ठा होती. त्यांनी मला दहावीपर्यत शिकवले अन् परीक्षा झाल्याबरोबर 1974 ला माङो लग्न केले. पती  जगन्नाथ सपकाळे हेही शिक्षक होते. 10 वर्षे सुखाचा संसार चालला. या संसार वेलीवर एक मुलगी आणि मुलगा पंकज, अजय हे दोन मुलं फुलली. मात्र 1984  मध्ये आमच्या संसाराला नजर लागली अन् पतीचे आकस्मिक निधन झाले. तेव्हा माझी मुलं लहान होती. त्यांच्या जाण्यानं माङयावर आभाळच कोसळलं.
4 अशा दु:खात मला वडील केदार गुरुजी यांची भक्कम साथ भेटली. त्यांनी मला धीर देत मी दहावी पास असल्याने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी प्रय} केले अन् मी 1985 मध्ये अनट्रेन शिक्षिका म्हणून रूजू झाले. नंतर पोस्टाद्वारे डी.एड. करून नोकरी करून शाळेतील मुलांसह घरच्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. संघषार्तून मार्ग काढत मोठा मुलगा पंकज सपकाळे यास एम.ए. इंग्रजी विषयातून केले. तो  आज पोलीस उपनिरीक्षक झाल्याने माङया कष्टाचे चिज झाल्याचे समाधान मला आहे, तर दुसरा मुलगा अजय सपकाळे हा नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय. मुलगी नगरपालिकेत प्रकल्प अधिकारी म्हणून कामाला होती. मात्र तिचे लग्न झाले.
जीवन संघषार्तून अवघं आयुष्य मुलांसाठी दिल्याचं समाधान आहे. दोघं उच्च पदावर असलेले मुलं, मुलगी यांचा संसारही फुलल्याचा आनंद   आहे.

Web Title: In the adverse circumstances, the child made the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.