वकिलाने लगावली कानशिलात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 12:57 AM2017-04-11T00:57:10+5:302017-04-11T00:57:10+5:30
भूसंपादनाचा वाद : शेतक:याने दिली जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार
जळगाव : प्रकल्प बाधीत जमिनीचा मोबदला घेण्यासाठी गेलेल्या शालिग्राम साहेबराव सोनवणे (वय 58 रा.बुधगाव, ता.चोपडा ह.मु.धुळे) या शेतक:याला त्यांचे वकील संदीप ज्ञानेश्वर पाटील (रा. शिवकॉलनी, जळगाव) यांनी कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी दुपारी वकीलाच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला वकीलाविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
शालिग्राम सोनवणे यांची बुधगाव, ता.चोपडा येथील गट क्र.49/1 ही शेत जमीन तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित झालेली आहे. या जमिनीच्या मोबदल्यासाठी त्यांना 74 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 40 लाख रुपये आगाऊ मिळावे यासाठी त्यांनी तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे अर्ज केला आहे. दरम्यान, अॅड.संदीप पाटील हे बुधगाव येथील प्रकल्पबाधीत शेतक:यांच्यावतीने काम पाहत आहेत. शालिग्राम सोनवणे यांचेही काम त्यांच्याकडे आहे. मोबदल्यासाठी तुम्ही परस्पर अर्ज कसा केला या कारणावरुन वकील व शेतकरी यांच्यात वाद झाला. त्यानंतर सोमवारी सात लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी सोनवणे हे जळगावात आले होते. दुपारी 3 ते 4 वाजेर्पयत वकीलांच्या कार्यालयात मोबदल्यावरुन वाद सुरु होता. रक्कम देण्याआधी वकीलांनी ताबा मिळाला म्हणून को:या पावत्यावर सह्या घेण्याचा प्रय} केला. त्यास शेतक:याने विरोध केला असता दोघांमध्ये वाद होवून वकीलांनी आपल्या कानशिलात लगावली. दरम्यान, ‘मी सांगेल त्या ठिकाणी तुला सह्या कराव्या लागतील, नाही केल्या तर तुला जळगावात पाय ठेवू देणार नाही’ असे धमकावत मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
आज सात लाख रुपये देण्याचे वकीलाने मान्य केले होते. को:या पावत्यावर सह्या करण्यास विरोध केल्याने वकीलाने मला मारहाण करुन कानशिलातही लगावली. त्यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे. -शालिग्राम सोनवणे, शेतकरी, बुधगाव
माङयाकडे कोणताही शेतकरी आला नाही व मी कोणाच्याही को:या पावत्यावर सह्या घेतल्या नाहीत.
-अॅड.संदीप पाटील