Independence Day : चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखान्यावर १० वर्षानंतर ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 01:32 PM2018-08-16T13:32:09+5:302018-08-16T13:32:37+5:30
चाळीसगाव, जि. जळगाव : प्रदीर्घ कालखंडानंतर बेलगंगा सह. साखर कारखाना परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले.
गेल्या दहा वषार्पासून कारखान्याला कुलूप होते. सद्यस्थिती कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत असून रोलसह गव्हाणी पूजनही झाले आहे. नुकतेच ऊसतोड मजुरांना चार कोटी रुपये देखील वाटण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच कारखान्यातून गाळप होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बुधवारी कारखाना स्थळावर चित्रसेन पाटील यांच्याहस्ते ध्वजपूजन तर ध्वजारोहण उद्योगपती प्रविण पटेल यांच्याहस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व सहकार महर्षि रामराव जिभाऊ पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन मोनिका पाटील, नितू शुक्ला, नगरसेविका योगिनी ब्राम्हकार यांच्या हस्ते झाले. यावेळी अंबाजी गृपचे दिलीप रामराव चौधरी, उद्योगपती प्रेमचंद खिंवसरा, अजय शुक्ला, शरद मोराणकर, डॉ. अभिजीत पाटील, रविंद्र केदारसिंग पाटील, राजेंद्र धामणे, नीलेश निकम, विनायक वाघ, अशोक ब्राम्हणकार, किरण देशमुख, सुशिल जैन, एकनाथ चौधरी, नीलेश वाणी यांच्यासह कामगार, अधिकारी वृंद देखील उपस्थित होते.