17 वर्षानंतर अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र रद्द

By Admin | Published: April 1, 2017 12:53 AM2017-04-01T00:53:48+5:302017-04-01T00:53:48+5:30

फटका : टिश्यू कल्चर केळी संशोधन केंद्र व कृषी अवजार केंद्राचे काम बंद

After 17 years the police training center was canceled | 17 वर्षानंतर अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र रद्द

17 वर्षानंतर अखेर पोलीस प्रशिक्षण केंद्र रद्द

googlenewsNext

जळगाव : तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र तब्बल 17 वर्षानंतर शासनाने रद्द केले आहे. जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात एक रुपयांचीदेखील तरतूद केली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते 1999 मध्ये वरणगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन झाले होते. त्यासाठी 106 एकर जागादेखील देण्यात आली होती. या कामासाठी 10 लाखांचा निधीदेखील खर्च झाला होता. मात्र आता हे काम टेंडरप्रक्रियेत असताना शासनाकडून अचानक पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम रद्द करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात कृषी विद्यापीठाची घोषणा देखील करण्यात आली होती. मात्र ते जळगावात व्हावे की धुळ्यात यावरून मतभेद होते. त्यामुळे यासाठी एका समितीची शासनाने नियुक्ती केली होती.
या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून विद्यापीठ गरजेचे असल्याचे या समितीचे मत आहे. मात्र त्यानंतरही कृषी विद्यापीठाचे काम थांबले आहे.
तसेच भुसावळ-जामनेर रस्त्यावरील आयटीआयजवळ पाच एकर जागेत उभारण्यात येणा:या कुक्कुट संशोधन प्रकल्पदेखील शासनाने रद्द केला आहे. हे प्रकल्प तत्कालीन पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे.
पाल येथे उद्यान विद्या महाविद्यालयासाठी 100 एकर जागा मंजूर केली आहे. जळगाव तालुक्यातील मोहाडी शिवारातील 100 खाटांच्या महिला रुग्णालयासाठी शासनाने जागा दिली आहे. तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम अर्थमंत्र्यांनी एका वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील भाषणावेळी दिले होते, मात्र या अर्थसंकल्पात एक रुपयांच्या निधीचीदेखील तरतूद यासाठी केलेली नाही.
चोपडय़ासाठीचा  निधी आलाच नाही
चोपडा तालुक्यातील मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी 25 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला होता. तसेच चोपडा येथे अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी शासकीय आयटीआयसाठी 4 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र त्यापैकी एक रुपयादेखील शासनाकडून मिळालेला नाही. मुक्ताईनगरात अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी पॉलिटेक्नीक कॉलेज मंजूर झाले आहे. त्यासाठी जागादेखील देण्यात आली आहे. मात्र हे काम आता थंडबस्त्यात आहे. यासोबत बोदवड तालुक्यातील नाडगाव-आमदगाव शिवारात मंजूर असलेले तूर संशोधन केंद्राचे कामदेखील थांबले आहे.

Web Title: After 17 years the police training center was canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.