वाकोदच्या माजी विद्यार्थ्यांची १९ वर्षानंतर मस्ती की पाठशाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:42 PM2018-12-26T21:42:49+5:302018-12-26T21:45:19+5:30
येथील स्व.राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा वाकोद जैन विद्यालय व जैन फार्म हाऊस येथे झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी आपल्या बालपनाच्या आठवनींना उजाळा दिला.
वाकोद,ता.जामनेर : येथील स्व.राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा वाकोद जैन विद्यालय व जैन फार्म हाऊस येथे झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी आपल्या बालपनाच्या आठवणींना उजाळा दिला.
सकाळी १० वाजता स्नेह मेळाव्यास सुरुवात झाली. वाकोद गावी या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणचे वर्गमित्र एकत्र आल्याने आनंदीत झाले. १९ वर्षा नंतर पुन्हा शाळा भरल्याचा अनुभव या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना अनुभवास आला. या भेटीत अनेक वर्गमित्र अतिशय भारावले होते. सर्वांनी भावनिक होऊन निरोप घेतला. १९९९ ची इ.१० वी ची बॅच एकत्र आणण्यासाठी विलास कुमावत यांनी पुढाकार घेतले. यावेळी १०० पेक्षा जास्त वर्गमित्र व शिक्षक उपस्थित होते. यावेळी पोलीस शिपाई संघपाल तायड़े आणि प्रमोद जंजाळकर दापोरा यांच्या सुमधुर गाण्यावर बेधुंद होऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक थिरकले.
विधवा मैत्रिणींना मदतीचा हात
विलास कुमावत यांच्यातर्फे रत्नकला शिंदे व कडूबाई देहेडे या दोघा माजी विद्यार्थिनी विधवा असल्याने विलास कुमावत यांनी सन्मान करीत १६०० रुपये रोख व साडी चोळी देवून मदतीचा हात दाखविला. कुमावत यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. रत्नकला शिंदे यांच्या पतीचे अकाली निधन झाल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने विलास कुमावत आणि गजानन काळे (पोलीस) यांनी रत्नकला शिंदे यांच्या दोन्ही मुलींना दत्तक घेण्याचे ठरविले. यापुढे शालेय शिक्षणाचा संपूर्ण खर्च व अडचणीत मदत करण्याचे ठरवले आहे.