कमी वयातील पोलिसानंतर आता जिल्ह्यात अव्वल फौजदाराचा बहुमान
By admin | Published: May 8, 2017 03:43 PM2017-05-08T15:43:07+5:302017-05-08T15:43:07+5:30
मुस्तफा मिर्झा याने काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या निकालात खात्यातंर्गत फौजदार परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळविला.
Next
आॅनलाईन लोकमत विशेष
जळगाव, दि.८ - यशासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो. त्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. कठोर मेहनतीच्या आधारे जिल्हा पोलीस दलात सर्वात कमी वयाचा पोलीस ठरणाºया भडगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या मुस्तफा मिर्झा याने काही दिवसांपूर्वी घोषित झालेल्या निकालात खात्यातंर्गत फौजदार परीक्षेत पहिला येण्याचा बहुमान मिळविला.
भडगावसारख्या छोट्या शहरात जन्माला आलेल्या मुस्तफा मिर्झा याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या खात्यातंर्गत स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठले आहे. वडील शकुर बेग मिर्झा अगदी सामान्य ‘फेरीवाला’. दिवसभर कष्ट करून आठवडे बाजारात थांबले. भडगावच्या सैय्यद वाड्यात मातीच्या घरात दोन बहीणी, आई आबेदा, मोठाभाऊ गफुर, अझर आणि सर्वात लहान मुलगा ‘मुस्तफा" अशी या परिवारातील सदस्यांची संख्या. परिस्थितीची जाणीव असल्याने आपल्या आर्थिक ऐपतीनुसारच वडिलांचे आपल्या कुटुंबासाठी छोटे मोठे स्वप्न होते. मात्र आई आबेदा या जळगावच्या पोलिस लाईनमध्ये वाढलेल्या होत्या. वडील पोलिस जमादार करीम सिराजोद्दीन यांनी गरीबीतही कशा पद्धतीने आपल्या कुटूंबाला घडविले याचे बालकडू त्यांना लहानपणापासून मिळाले होते. काम करुन शिक्षण घेणाºया त्यांच्या मुलांपुढे आजोबांचा आदर्श होता. यासाºयात शिक्षणाची कास धरुन जिल्हा पोलीस दलात रुजू व्हायचे या निश्चयाने मुले प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले. प्रयत्नांना यशाची जोड मिळाली अन् तीन पैकी दोन्ही मुलं पोलिसात नोकरीला लागले. त्यात मुस्तफा याला जळगाव जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचा पोलीस असल्याचा बहुमान मिळाला. अगदी अठरा वर्षे २ दिवसांचा असतांना त्याने पोलीस भरतीवेळी जिल्हा पोलीस दलाचे कवायत मैदान गाजविले. १६०० मिटर रनिंग मध्ये धावतांनाच तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांनी मुस्तफाला कवेत घेत त्याचे वय विचारले. ‘अबे इतना छोटा पोलीस" असे आश्चर्यकारक उद्गार त्यांनी मुस्तफाला पाहून काढले होते. हळूहळू गरीबीचे दिवस कमी होत गेले. सुखाचे दिवस आले मात्र ते पाहण्यासाठी वडिल या जगात राहिले नाही. २०१४ मध्ये वडिलांच्या निधनानंतर आई एकटीच घरात होती. मोठा भाऊ नाशकात, मधला भुसावळ बाजारपेठला नियुक्तीला असल्याने मुस्तफाने स्वत: साईड ब्रांच मागून घेतली. नोकरीसह आईची सेवा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. धर्माचरणा प्रमाणे विधवा आईला मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या मक्का मदिना येथे ‘हज’ यात्रेसाठी स्वत: घेवून जात त्याने जबाबदार मुलाचे कर्तव्य पूर्ण केले. २१ आॅगस्ट २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक २३ हजार २४३ परिक्षार्थींनी परीक्षा दिली. जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी असलेल्या मुस्तफाने कमी वयाच्या पोलीस या बहुमानासोबत खात्यातंर्गत उपनिरीक्षक परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून पहिला तर राज्यातून २३ वा येण्याचा दुसरा बहुमान पटकावला.