उष्माघाताने मृत्यूनंतर चालकाच्या वारसांना मदतीचा हात
By admin | Published: April 3, 2017 10:52 AM2017-04-03T10:52:53+5:302017-04-03T10:52:53+5:30
एस़टी़ चालक प्रमोद आनंदा कोळी (वय 36) यांचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना कामगार सेनेतर्फे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला़
Next
भुसावळ, दि. 3- भुसावळ आगारातील एस़टी़ चालक प्रमोद आनंदा कोळी (वय 36) यांचा शनिवारी उष्माघाताने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना कामगार सेनेतर्फे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला़
1 रोजी अक्कलकुवा ते पुणे हे नियोजित कर्तव्य बजवित असतांना त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता़ 2 एप्रिल रोजी साकरी, ता़भुसावळ येथे त्यांच्या मूळ गावी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष आऱ क़े पाटील, विभागीय सचिव संजय सूर्यवंशी, गोपाळ पाटील, संघटक सचिव प्रकाश ठाकरे, जळगाव आगाराचे सचिव आऱ आऱ शिंदे, उपाध्यक्ष कैलास साळुंखे, जळगांव आगाराचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, भुसावळ आगाराचे अध्यक्ष जगन गोसावी, सचिव दीपक कोळी, सुभाष सपकाळे आदींनी भेट देत मयत प्रमोद कोळी यांच्या पत्नी नीलिमा कोळी यांना 25 हजार रुपये मदतीचा धनादेश दिला़
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घटनेची दखत घेत कोळी यांना मिळणारी अंतिम देयके व नियमानुसार मिळणारे लाभ तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत़