पतीच्या निधनानंतरही मुलीचे शिक्षण केले पूर्ण
By admin | Published: May 14, 2017 06:51 PM2017-05-14T18:51:18+5:302017-05-14T18:51:18+5:30
संतोष माळी यांचे अपघातात निधन झाल़े तरीसुध्दा त्यांनी मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण करुन तिचे लग्न शिक्षक असलेल्या मुलाशी लावून दिल़े
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 14 - शहरातील माळीवाडा येथे राहणा:या मीराबाई संतोष माळी यांच्याबाबत दैव इतके क्रुर कसे झाले असा प्रश्न पडणार नाही तोच नवल़ तान्हुली पोटात असतानाच मीराबाई यांचे पती संतोष माळी यांचे अपघातात निधन झाल़े तरीसुध्दा त्यांनी मुलीचे पदवीचे शिक्षण पूर्ण करुन तिचे लग्न शिक्षक असलेल्या मुलाशी लावून दिल़े
मीराबाई गेल्या तब्बल 30 वर्षापासून भाजीपाला खरेदी विक्रीच्या व्यवसायात आह़े 1975 साली थाटामाटात लगA झाल्यावर 1983 साली मीराबाई यांच्या पतीचे एका भीषण अपघातात निधन झाल़े मुलगी अनिता ही पोटात असतानाच मीराबाई यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला़ यातून त्यांनी स्वत:ला सावरले.
परिवारात सर्व अशिक्षीत असल्याने मुलगी झाली म्हणून काय झाले त्यांनी मुलीला पदवीर्पयतचे शिक्षण दिल़े घरात सासू, सासरे, दीर, जाऊ त्यांची मुले असा मोठा परिवार आह़े परंतु परिवारावर ओङो न होता़ त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या मुलीला शिक्षण देण्याचा संकल्प केला व त्यानुसार त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण दिल़े यात त्यांना त्यांच्या परिवाराचीही उत्तम साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितल़े पतीचे अकाली निधन झाले पदरी एक मुल असल्याने त्यांनी मोठय़ा धीराने मुलगी अनिता हिला लहानचे मोठे करीत सुशिक्षीतसुध्दा केल़े अनिता हिचे पती आयटीआयमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला आह़े