पतीच्या निधनानंतर सावरत मुलांना घडवलं

By admin | Published: May 14, 2017 07:20 PM2017-05-14T19:20:52+5:302017-05-14T19:20:52+5:30

शिवणकाम करणे, पापड लाटणे यासारखी कामं स्वीकारली, तर कधी बचत गटातदेखील कामं केली.

After the death of her husband, she took up the children | पतीच्या निधनानंतर सावरत मुलांना घडवलं

पतीच्या निधनानंतर सावरत मुलांना घडवलं

Next

ऑनलाइन लोकमत

पाचोरा, जि. जळगाव, दि. 14 - पती ड्रायव्हिंग व्यवसाय करीत असताना कुटुंबाची होणारी परवड प्रतिभा नंदू पाटील (पाचोरा) यांना बघवत नव्हती.  म्हणून त्यांनी शिवणकाम करणे, पापड लाटणे यासारखी कामं स्वीकारली, तर कधी बचत गटातदेखील कामं केली. मुलगी मयुरी आणि मुलगा कार्तिक यांना अभ्यासाची गोडी लावली. पतीचा अकस्मात मृत्यू पूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता. पण प्रतिभा पाटील खंबीरपणे उभ्या राहिल्या. एका खासगी शाळेत आया म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. पण दोन्ही मुलांनी आई व वडिलांची मेहनत सफल करीत भरघोस शैक्षणिक यश संपादन केलं. मुलीनं डिप्लोमा पूर्ण करून पुणे येथे इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत असून स्पर्धा परीक्षांच्या जोरावर  मोठी ङोप घेण्याची तिची तयारी आहे. मुलगा कार्तिक संगमनेर येथे इंजिनियरिंगला शिकतोय. मुलांनी प्रत्येक वर्षात मिळवलेले यश ही आपली शिदोरी असून, उज्‍जवल भविष्याची वाट असल्याचे प्रतिभा पाटील सांगतात.

Web Title: After the death of her husband, she took up the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.