प्रसुत झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर पाचोऱ्याच्या डॉक्टरने ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:21 PM2018-10-10T23:21:45+5:302018-10-10T23:24:58+5:30
पाचोरा येथील खासगी दवाखान्यात प्रसूत झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात हलविलेल्या वैशाली हेमंत पाटील (२५, रा.गोरगावले, ता.चोपडा, माहेर नगरदेवळा) या महिलेचा मृत्यू होताच, डॉक्टरने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव : पाचोरा येथील खासगी दवाखान्यात प्रसूत झाल्यानंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात हलविलेल्या वैशाली हेमंत पाटील (२५, रा.गोरगावले, ता.चोपडा, माहेर नगरदेवळा) या महिलेचा मृत्यू होताच, डॉक्टरने धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैशाली हिच्या मृत्यूस पाचोरा येथील डॉ.दीपक देवरे हे जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
दरम्यान, मंगळवारी रात्री या विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले, मात्र मृतदेह ताब्यात देण्यासाठी लागणाºया कागदपत्रांवर तसेच अहवालावर एका डॉक्टरने सही करण्यास टाळाटाळ केल्याने दोन तास मृतदेहाचा ताबा मिळाला नाही, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दुपारी साडे बारा वाजता मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तो सासरी गोरगावले येथे नेण्यात आला व दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.