कोंब आलेला मका खाल्ल्याने ३५ मेंढ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 06:01 PM2019-11-19T18:01:16+5:302019-11-19T18:01:21+5:30
बोदवड तालुक्यातील घटना : मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसान बोदवड : तालुक्यातील उजनी जंगल व जुनोने गाव शिवार हद्दीत ...
बोदवड तालुक्यातील घटना : मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसान
बोदवड : तालुक्यातील उजनी जंगल व जुनोने गाव शिवार हद्दीत एका मेंढपाळाच्या सुमारे ३५ मेंढ्या दगावल्याची घटना समोर आली असून यात या मेंढपाळाचे तीन लाखाचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. शेताच्या बाजुला फेकलेला कोंब आलेला मका खाल्ल्याने या मेंढ्यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले.
जुनोना शेतशिवरात मेंढ्या चारणाऱ्या जगदेव जोगा ठेलारी, वामन जोगा येळे, लक्ष्मण जगदेव ठेलारी, हिरामण ठेलारी,नारायण जगदेव ठेलारी,रा. जुनोना ता. बोदवड व बळीराम यदु केसकर रा. कुºहा काकोडा ता. मुक्ताईनगर हे मेंढ्या चारत असताना १८ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन ते तीन मेंढ्यांनी माना टाकत जीव सोडला असता त्यांना वाटले काही आजार असावा. पण मंगळवारी सकाळी दिवस निघताच त्यांनी मेंढ्या बसवलेल्या शेतात पाहणी केली असता जवळपास आणखी २० ते २५ मेंढ्या ठिकठिकाणी मृत अवस्तेत पडलेल्या आढळल्या.
याबाबत बोदवड पशु वैदकीय अधिकारी पदाचा प्रभारी पदभार असलेले व भुसावळ येथील पशु वैदकीय अधिकरी एस. बी. तडवी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की, मक्याला बुरशी लागल्याने तसेच खालील भाग विषाणू जन्य झाल्याने हा प्रकार झाला असावा. मेंढपाळास औषधांच्या डोसाबाबत माहिती दिल्याचेही ते म्हणाले.