वांजोळा येथे भांडणानंतर म्हशी पडल्या विहिरीत
By Admin | Published: May 21, 2017 05:06 PM2017-05-21T17:06:29+5:302017-05-21T17:06:29+5:30
शेतात चराईसाठी आलेल्या म्हशींमध्ये अचानक भांडण झाल्याने त्या विहिरीत जावून कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर आणि शेतक:यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने दोघा जनावरांचे प्राण वाचल़े
भुसावळ,दि.21- शेतात चराईसाठी आलेल्या म्हशींमध्ये अचानक भांडण झाल्याने त्या विहिरीत जावून कोसळल्या. मात्र दैव बलवत्तर आणि शेतक:यांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने दोघा जनावरांचे प्राण वाचल़े तालुक्यातील वांजोळा येथे रविवारी दुपारी ही घटना घडली़
वांजोळे-मिरगव्हाण रस्त्यालगत शेत गट क्र.11 अ मध्ये शेतकरी रामदास गोंडू पाटील यांच्या मालकीच्या शेतात गुराखी आत्माराम सांडू सावळे यांनी गुरे आणली होती. मात्र अचानक दोन म्हशींमध्ये भांडण सुरू झाल्याने त्या शेतातील विहिरीत पडल्या़ पाहता-पाहता गावात याची माहिती मिळताच अनेकांनी शेताकडे धाव घेतली़ दोरखंडाने म्हैस काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र वजन जास्त असल्यो प्रयत्न असफल ठरल़े म्हशींचे व्यापारी लाला वाणी यांनी लागलीच क्रेन मागवली़ गावातील पाण्यात पोहणा:यांनी विहिरीच्या पाण्यात उतरत म्हशींच्या पोटाखाली दोर बांधला. तसेच म्हशी पाण्यात बुडू नये यासाठी लाकडी पाटय़ाही ठेवण्यात आल्या़ काही वेळेत म्हशींना क्रेन आल्यानंतर पाण्याबाहेर काढण्यात आल़े गावातील नागरीक बबन सावळे, सुरेश पाटील, कृष्णा कोळी, अशोक सावळे, पिंटू सावळे, राम, लक्ष्मण सावळे यांनी याकामी मदत केली़