चार तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत

By admin | Published: February 27, 2017 07:40 PM2017-02-27T19:40:14+5:302017-02-27T19:40:14+5:30

रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर रासायनिक खताचे वॅगन सोडून शंटींग करताना स्लोमोशनमध्येच इंजिन रुळावरुन खाली सरकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक चार तास खोळंबली.

After four hours, the rail transport is smooth | चार तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत

चार तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत

Next
>ऑनलाइन लोकमत
पाचोरा, दि. 27 -  रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर रासायनिक खताचे वॅगन सोडून शंटींग करताना स्लोमोशनमध्येच इंजिन रुळावरुन खाली सरकल्याने मध्य रेल्वेची वाहतूक चार तास खोळंबली. ती पहाटे ३.१५ नंतर वाहतूक सुरळीत झाली. 
२६ रोजी रात्री ११.१० चे सुमारास मुंबईकडून खताचा रॅक पाचोरा येथे आल्यावर मालधक्क्यावर वॅगन सोडून मालगाडीचे इंजिन यार्डाने शंटींग करताना चार कि.मी. वेगात जात असताना इंजिनचे पुढील तीन चाके रुळाच्या खाली घसरले. यामुळे वाहतूक तात्काळ थांबवली.  चार तासाच्या अथक परिश्रमाने वाहतूक सुरळीत झाली, यामुळे सर्व गाड्या तीन तास उशीराने धावत होत्या.  घटना कळताच एडीआरएम धार्मिक यांनी भेट देवून स्वतंत्र यंत्रणा राबवली. वरिष्ठ विभागीय इंजिनिअर साळुंखे यांचे टीमने चार तासात वाहतूक सुरळीत केली.  घटनेची रेल्वेतर्फे विभागीय चौकशी सुरु झाली आहे.  इंजिन चालक सोनार यांनी त्वरित गाडी थांबवली त्यामुळे मोठा अपघात टळला.

Web Title: After four hours, the rail transport is smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.