डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच जळगावात साखळी उपोषण घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 04:41 PM2018-11-27T16:41:54+5:302018-11-27T16:49:06+5:30

समांतर रस्त्यांच्या डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच समांतर रस्ते कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण १२ व्या दिवशी मागे घेतले.

After getting the copy of the DPR approval, behind the uproar in Chhattisgarh | डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच जळगावात साखळी उपोषण घेतले मागे

डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच जळगावात साखळी उपोषण घेतले मागे

googlenewsNext
ठळक मुद्देजळगाव शहरातील समांतर रस्त्यांसाठी सुरु होते साखळी उपोषणजानेवारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे नोव्हेंबरमध्येही पुन्हा आश्वासनअखेर १२ व्या दिवशी उपोषणाची सांगता

जळगाव : समांतर रस्त्यांच्या डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच समांतर रस्ते कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण १२ व्या दिवशी मागे घेतले. जानेवारी महिन्यात समांतर रस्ते कृती समितीने अजिंठा चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते, त्यावेळीही जिल्हाधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांना विविध आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. आता पुन्हा १० महिन्यांनंतर त्यांनी आश्वासनेच दिली आहे. त्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवून कृती समितीने आंदोलन मागे घेतले आहे.
शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम विविध आंदोलने करूनही मार्गी लागत नसल्याने समांतर रस्ते कृती समितीतर्फे १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला होता. समांतर रस्त्याच्या डीपीआर मंजुरीची प्रत मिळत नाही व काम सुरू होण्याची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे न घेण्याचा निर्धार करीत तब्बल १०० दिवस आंदोलन सुरूच राहिल, असे समांतर रस्ते कृती समितीने जाहीर केले होते.
मात्र या दोन्ही प्रमुख मागण्यांपैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताचे पत्र व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या तोंडी हमीनंतर सोमवारी आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: After getting the copy of the DPR approval, behind the uproar in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.